Lightning In Football Match : फुटबाॅल मॅच सुरु असताना थेट मैदानातील मध्यभागी वीज कोसळली; एक खेळाडू ठार, 7 गंभीर जखमी; 'फुटबाॅल पंढरी'त आक्रोश
Lightning In Football Match : या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातही व्हायरल होत आहे. 10 डिसेंबरला जोस एल्युटेरियो दा सिल्वा स्टेडियमवर União Gerrense आणि Unidos फुटबॉल क्लब यांच्यात सामना खेळला जात होता.
Lightning Strike In Football Match : फुटबाॅल (Football) खेळत असतानाच भर मैदानात मध्यभागी वीज कोसळल्याने अवघ्या 21 वर्षीय फुटबॉलपटूचा दुर्दैवी अंत झाला. ब्राझीलमधील 'सँटो अँटोनियो दा प्लॅटिना' शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान (Lightning Strike In Football Match) वीज पडली. मैदानाच्या मध्यभागी पडलेल्या या विजेमुळे एका 21 वर्षीय फुटबॉलपटूचाही मृत्यू झाला. इतर 6 खेळाडूही या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात आले. या सहा खेळाडूंवर उपचार सुरू आहेत.
तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातही व्हायरल होत आहे. 10 डिसेंबर रोजी जोस एल्युटेरियो दा सिल्वा स्टेडियमवर União Gerrense आणि Unidos फुटबॉल क्लब यांच्यात सामना खेळला जात होता. हा सामना 'अॅमॅच्युअर कप' अंतर्गत सुरू होता.
🇧🇷Lightning strikes around 4 players on the field during a football match in Santo Antônio da Platina, Brazil today. #Lightning #SantoAntôniodaPlatina #Brazil #latin #Football #sport pic.twitter.com/PpYEi0IisN
— Attentive Media (@AttentiveCEE) December 11, 2023
विजेचा कडकडाट होताच खेळाडू मैदानात कोसळले
सामन्यादरम्यान अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. यानंतर फुटबॉल मैदानावरच वीज कोसळली. खेळाडू मैदानाबाहेर परतण्याच्या तयारीत असतानाच त्यांना विजेचा धक्का बसला. अनेक खेळाडू मैदानावर पडले. 'União Gerrense फुटबॉल क्लब'चा खेळाडू कायो हेन्रिक डी लिमा गोन्काल्व्हसचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका खेळाडूची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा खेळाडू शहराबाहेरील प्रादेशिक (रिजनल) रुग्णालयात दाखल आहे. इतर चार खेळाडू सध्या शहरातील स्थानिक रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Lightning strikes around 4 players on the field during a football match in Santo Antônio da Platina, #Brazil today. The condition of the victims is not yet known. 😱⚡️pic.twitter.com/3lvdwpvPhe
— Volcaholic 🌋 (@volcaholic1) December 10, 2023
सॅंटो अँटोनियो दा प्लॅटिना सिटी हॉलने गोन्काल्व्ह्सच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. या अपघातामुळे प्रभावित झालेल्यांना योग्य ती मदत केली जाईल, असे सांगितले.
व्हिडिओ फुटेज भीतीदायक
या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. या व्हिडिओंचे व्हिज्युअल्स थोडे भीतीदायक आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की स्टेडियममध्ये जोरदार पाऊस पडत आहे आणि येथे उपस्थित काही प्रेक्षक जोरजोरात ओरडत आहेत. अनेक जण मैदानावर पडलेल्या खेळाडूंना उचलतानाही दिसत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या