(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup 2023 : वर्ल्डकपच्या सुरुवातीपासून 'डाव्यांच्या' कामगिरीने 'उजवे' झाले चकित! विश्वास बसत नाही? मग आकडेवारी पाहून घ्या
World Cup 2023 : डावखुरा फलंदाज असो किंवा गोलंदाज दोन्ही बाजूने अप्रतिम कामगिरी सुरु आहे. त्यामुळे सुरुवातीपासून 'डाव्यांच्या' कामगिरीने 'उजवे' झाले चकित झाले आहेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
धर्मशाला : क्रिकेट वर्ल्डकपची ( ICC Cricket World Cup 2023) दणक्यात सुरुवात झाली आहे. बाॅल आणि बॅटचा संघर्ष दररोज मैदानात होत आहे. विक्रमांचे रतीब सुद्धा दररोज घातले जात आहे. वर्ल्डकपला प्रारंभ झाल्यापासून एक विशेष आणि अनोखी कामगिरी घडल्याने क्रिकेटपटूही चाहत्यांनी सुखद धक्का बसला आहे. डावखुऱ्या खेळाडूंनी वर्ल्डकपमध्ये कामगिरीचा अक्षरश: धुमाकून घातला आहे. डावखुरा फलंदाज असो किंवा गोलंदाज दोन्ही बाजूने अप्रतिम कामगिरी सुरु आहे. त्यामुळे सुरुवातीपासून 'डाव्यांच्या' कामगिरीने 'उजवे' झाले चकित झाले आहेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे. इतकंच काय भारताची सलामीची लढत झाली. त्यामध्येही भारताचे दोन फिरकी स्टार रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि कुलदीप यादव (Kuldip Yadav) चमकले होते. दोघांच्या फिरकीने ऑस्ट्रेलियन फलंदाज पायात पाय घालून नाचताना दिसून आले. स्टीव्ह स्मिथला जडेजाने दांडी कशी गुल केली हे सुद्धा समजले नाही.
डावखुऱ्या फलंदाजांनी विरोधी संघाना घाम फोडला
बरं ही कामगिरी इतक्यावर थांबली नसून इतर संघातील डावखुऱ्या फलंदाजांनी सुद्धा आपली छाप सोडत वर्ल्डकपमध्ये हवा केली आहे. त्यामुळे एकप्रकारे डाव्यांचीच चलती आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंडकडून डेव्हीड काॅन्वेनं शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंड भारतीय वंशाचा रचिन रविंद्र (Rachin Ravindra) हा तर न्यूझीलंडसाठी लाॅटरी ठरला आहे. पहिल्याच सलामीच्या लढतीत त्याने शतकी खेळी करत जगाचे लक्ष वेधून घेतले. आयत्यावेळी संधी मिळूनही त्याने विश्वास सार्थ ठरवला. दुसऱ्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी पहिल्या सामन्यातील कामगिरी योगायोग नव्हता हे सुद्धा दाखवून दिले. रचिन हा फिरकी गोलंदाजी सुद्धा करतो.
वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा सामना श्रीलंका विरुद दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. या सामन्यात 754 धावांचा पाऊस पडला. या सामन्यातही डावखुऱ्या क्विंटन डिकाॅकने शतकी खेळी केली. दुसरीकडे याच सामन्यात श्रीलंकेचा डावखुला फलंदाज चरिथ असलंकाला शतक झळकावता आलं नाही, पण 79 धावांची दमदार खेळी केली.
इग्लंडच्या मलानकडूनही शतकी खेळी
आज (10 ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत इग्लंडचा सलामीवीर डावखुऱ्या डेव्हिड मलानने (Dawid Malan) दमदार कामगिरी करताना शतक ठोकले. डेव्हिड मलानने आज बांगलादेशची गोलंदाजी फोडून काढताना 107 चेंडूत 140 धावांचा पाऊस पाडला. त्याचे हे कारकिर्दीतील सहावे शतक ठरले.
इतर महत्वाच्या बातम्या