Canada Open Badminton 2023 : लक्ष्य सेनची दमदार कामगिरी, चीनच्या खेळाडूचा पराभव करत कॅनाडा ओपनवर कोरले नाव
Badminton 2023 : भारतीय बॅडमिंटन खेळाडू लक्ष्य सेन याने कॅनाडा ओपन 2023 मध्ये दमदार कामगिरी केली आहे.
Lakshya Sen Won Canada Open Badminton 2023 : भारतीय बॅडमिंटन खेळाडू लक्ष्य सेन याने कॅनाडा ओपन 2023 मध्ये दमदार कामगिरी केली आहे. लक्ष्य सेन याने सध्याचा ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शी फेंग याचा पराभव केला. चीनच्या ली शी फेंग याला लक्ष्य सेन याने 21-18, 22-20 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. या विजयासह लक्ष सेन याने पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावले आहे. लक्ष्य सेन याने बॅटमिंटन करिअरमध्ये दुसऱ्यांदा बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर 500 खिताबावर नाव कोरलेय. लक्ष्य सेन याने याआधी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.
लक्ष्य सेन याने याआधी जानेवारी 2022 मध्ये बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर 500 चषक जिंकला होता. लक्ष्य सेन याने त्यावेळी इंडिया ओपनवर नाव कोरले होते. आज चीनच्या ली शी फेंग याचा पराभूत करत लक्ष्य सेन याने जेतेपदावर नाव कोरलेय. 50 मिनिटे चालल्या सामन्यात लक्ष्य सेन याने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले होते. लक्ष्य सेन आणि चीनचा ली शी फेंग सहाव्यांदा आमनेसामने आले. यामध्ये लक्ष्य सेन याने 4 वेळा बाजी मारली आहे. 21 वर्षीय लक्ष्य सेन मागील काही वर्षांपासून कोर्टवर एकतर्फी वर्चस्व निर्माण करतोय. लक्ष्य सेन याने बॅडमिंटनमध्ये भारताचा दबदबा वाढवला आहे.
कॅनडा ओपन 2023 मध्ये उपांत्य फेरीत लक्ष्य सेन याने जपानच्या कंटो निशमोतो याला 21-17 आणि 21-14 च्या फरकाने पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली होती. मागील काही दिवसांपूसन लक्ष्य सेन याच्या कामगिरीत सातत्य दिसत आहे. त्यामुळेच त्याला बॅडमिंट क्रमवारीत बढती मिळाली असून तो 19 व्या स्थानावर पोहचलाय.
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍 🏆😍
— BAI Media (@BAI_Media) July 10, 2023
Lakshya defeated reigning All England winner 🇨🇳's Li Shi Feng to clinch the title 🔥💥
📸: @badmintonphoto#CanadaOpen2023#IndiaontheRise#Badminton @lakshya_sen pic.twitter.com/4DIFquYoBK
जापानच्या महिला खेळाडूने जिंकले महिला एकेरीचं विजेतेपद -
महिला एकेरीच्या चषकावर जपानच्या अकाने यमागुची याने नाव कोरलेय. तिने थायलँडच्या रत्चानोक इंतानोन हिचा 21-19 आणि 21-16 अशा फरकाने पराभव केला. भारतीय महिला खेळाडू पीव्ही सिंधू हिचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते.
खालील बातम्या वाचायला विसरु नका:
IND vs WI : वेस्ट इंडिजमध्ये भारताची कामगिरी कशी? कसोटी मालिकेपूर्वी ही आकडेवारी वाचाच