Kuldeep Yadav Slapping Rinku Singh: IPL मध्ये नवा वाद; सामना संपताच कुलदीपनं रिंकूच्या खाडकन कानफटात मारली, VIDEO
Kuldeep Yadav Slapping Rinku Singh: आयपीएल 2025 मध्ये मंगळवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सला हरवलं आहे. या सामन्यानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कुलदीप यादवनं रिंकूला कानफाटात मारल्याचं दिसतंय.

Kuldeep Yadav Slapping Rinku Singh: आयपीएल 2025 च्या 48व्या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 14 धावांनी पराभव केला. अरुण जेटली स्टेडियममध्ये (Arun Jaitley Stadium) सामना संपल्यानंतर खेळाडू एकमेकांशी बोलत असल्याचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कुलदीप यादव रिंकू सिंगला खाडकन कानाखाली लगावतो. त्यानंतर रिंकूसुद्धा चिडल्याचं पाहायला मिळालं आहे.
आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. तर, रिंकू सिंग कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. हा व्हिडीओ सामन्यानंतरचा आहे, ज्यामध्ये दोन्ही संघाचे खेळाडू प्रत्येक सामन्यानंतर जसे एकमेकांशी बोलतात, अगदी तसंच सर्वजण एकमेकांशी बोलत आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना कुलदीप यादव रिंकूला काहीतरी बोलतो आणि खाडकन त्याच्या कानाखाली मारतो. रिंकू आधी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो आणि कुलदीपकडे दुर्लक्ष करतो. पण कुलदीप रिंकूच्या कानाखाली मारतो आणि रिंकूचा चेहरा रागानं लाल होतो. रिंकू रागात कुलदीपकडे एकटक पाहत बसतो.
Yo kuldeep watch it pic.twitter.com/z2gp4PK3OY
— irate lobster🦞 (@rajadityax) April 29, 2025
कुलदीप आणि रिंकूचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे आणि त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. कुलदीप रिंकूला थेट कानाखाली का मारतो? हे नेमकं कशामुळे घडतं? याबद्दल नेटकऱ्यांना आश्चर्य वाटतंय. एका युजरनं बीसीसीआय, दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांना टॅग केलं असून लिहिलंय की, "हे नक्की काय प्रकरण आहे?", तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "रिंकूनं कुलदीपची काहीतरी खोड काढली वाटतं?" जणू काही तो नाराज झाला आहे असंच दिसतंय. दुसऱ्या एका युजरने लिहिलंय की, "कुलदीपचं वागणं अत्यंत वाईट आणि चुकीचं आहे."
पुढे एका युजरनं लिहिलंय की, "भावा, खरंच मारलीय यानं... पूर्ण व्हिडीओ नाही का कुणाकडे? शेवटी रिंकूनं कदाचित शिव्या दिल्यात." ज्या ट्विटर हँडलवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आलेला, त्यानं युजरच्या या प्रश्नावर उत्तर दिलंय की, "नाही, त्यानंतर दोघंही इंटरव्यूसाठी निघून गेलेले..."
केकेआरच्या प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत
कोलकाता नाईट रायडर्सनं सर्वात आधी फलंदाजी करताना 204 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात तशी फारशी चांगली झाली नाही, पण एका क्षणी फाफ डु प्लेसिस सेट झाल्यावर संघ विजयाच्या जवळ पोहोचला. डु प्लेसिसनं 45 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीनं 62 धावा केल्या. अक्षर पटेलनंही 23 चेंडूत 43 धावांची शानदार खेळी केली. विपराज निगमनं शेवटपर्यंत झुंज दिली, त्यानं 19 चेंडूत 38 धावा केल्या पण तरीसुद्धा विजयापासून हुकला.
केकेआरनं विजय मिळवल्यानंतर प्लेऑफच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. पण, या सामन्यानंतर पॉईंट टेबलमधील केकेआरच्या रँकमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली कॅपिटल्स 12 पॉईंटसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर, कोलकाता 9 पॉईंट्ससह सातव्या क्रमांकावर आहे.
Media (𝘴𝘢𝘯𝘴𝘢𝘯𝘪) vs (𝘥𝘰𝘴𝘵𝘰𝘯 𝘬𝘦 𝘣𝘦𝘦𝘤𝘩 𝘬𝘢) Reality!
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 30, 2025
𝘎𝘦𝘩𝘳𝘪 𝘥𝘰𝘴𝘵𝘪 feat. our talented UP boys 😂 pic.twitter.com/2fY749CSXf
खरंच कुलदीप, रिंकूमध्ये नवा वाद?
कुलदीप यादव आणि रिंकू सिंह यांच्यात झालेला वाद खरा की, खोटा? खरंच कुलदीपनं रिंकूच्या कानफाटात मारली का? नेमकं घडलं काय? असे अनेक प्रश्न नेटकरी विचारत आहेत. अशातच आता केकेआरनं कुलदीप आणि रिंकूचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दोघांची मैत्री दाखवण्यात आली आहे. याला केकेआरनं क्लासी कॅप्शन दिलं आहे.
केकेआरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "Media (𝘴𝘢𝘯𝘴𝘢𝘯𝘪) vs (𝘥𝘰𝘴𝘵𝘰𝘯 𝘬𝘦 𝘣𝘦𝘦𝘤𝘩 𝘬𝘢) Reality! 𝘎𝘦𝘩𝘳𝘪 𝘥𝘰𝘴𝘵𝘪 feat. our talented UP boys" केकेआरच्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांचा जीवात जीव आला असून हा वाद नव्हता, तर कुलदीप रिंकूसोबत मस्करी करत असल्याचं समोर आलं आहे.






















