केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतूनही बाहेर
राहुल आणि पंड्या यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे दोघांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मुकावं लागलं होतं.
मुंबई : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला भारतीय संघातून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर राहुलला आणखी एक झटका बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर आता राहुल टी-20 मालिकेतूनही बाहेर झाला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीदरम्यान तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मात्र यादरम्यान केएल राहुल 'भारत अ' संघाकडून इंग्लंड लायन्सच्या विरोधात अनऑफिशिअरल कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे.
राहुल आणि पंड्या यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे दोघांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मुकावं लागलं होतं. सध्या दोघांवरील निलंबन मागे घेण्यात आलं आहे. त्यानंतर हार्दिक पंड्याचं न्यूझीलंड दौऱ्यात पुनरागामन झालं तर केएल राहुल 'भारत अ' संघांत खेळणार आहे.
काय आहे प्रकरण?
हार्दिक पंड्या आणि केएल राहुल करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आले होते. या शोमध्ये त्यांनी अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या होत्या. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने शोमध्ये सांगितलं.
आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिप होतो आणि ही बाब पालकांनाही माहित असल्याची कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली. तो म्हणाला की, "जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना 'आज मी करुन आलोय' असं सांगितलं होतं. यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्या आणि केएल राहुलविरोधात संतापाची लाट पसरली आहे.
संबधित बातम्या
करणची कॉफी भोवली, पंड्या आणि राहुल निलंबित
राहुल-पंड्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर विराटची प्रतिक्रिया
हार्दिक आणि राहुलवर दोन वनडे सामन्यांच्या बंदीची शिफारस
पंड्या आणि राहुलच्या निलंबनानंतर ‘या’ दोन खेळाडूंची संघात निवड