एक्स्प्लोर
Advertisement
टी20 मध्ये सर्वात वेगवान तीन हजार धावा करणारा केएल राहुल पहिला भारतीय
टी20 क्रिकेटमध्ये तीन हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. गौतम गंभीरचा विक्रम मोडित राहुलने हा टप्पा सर्वात वेगाने पार केला.
मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज केएल राहुलने टी20 क्रिकेटमध्ये नवीन विक्रम नोंदवला आहे. राहुल हा टी20 मध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे. 93 डावांमध्ये के एल राहुलने तीन हजार धावा पार केल्या.
के एल राहुल हा गेल्या दोन वर्षांत लिमिटेड ओव्हरच्या फॉर्मेटमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबतर्फे खेळणाऱ्या के एल राहुलने कालच्या सामन्यातही लौकिकाला साजेशी कामगिरी केली. कालच्या सामन्यात राहुलने 27 चेंडूंमध्ये 42 धावा ठोकत हा विक्रम आपल्या नावे केला. बंगळुरुने हा सामना जिंकल्याने राहुलची खेळी व्यर्थ ठरली.
टी20 क्रिकेटमध्ये तीन हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. गौतम गंभीरचा विक्रम मोडित राहुलने हा टप्पा सर्वात वेगाने पार केला. अवघ्या 93 डावांमध्ये त्याने तीन हजार धावांना गवसणी घातली. शॉन मार्श हा (85 डाव) जगात अव्वल स्थानी आहे.
विराट कोहलीने 40.91 च्या सरासरीने 8 हजार 305 धावांचा टप्पा टी20 क्रिकेटमध्ये ओलांडला आहे. 311 सामने खेळलेला धोनी हा 6 हजार 519 धावा ठोकत या यादीत तिसरा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement