दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 7 गडी राखून विजय
दिल्लीकडून शिखर धवनने 63 चेंडून 97 धावांनी खेळी केली. तर रिषभ पंतने धवनला चांगली साथ दिली. रिषभने 31 चेंडूंत 46 धावां कुटल्या.
कोलकाता : दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. कोलकाताने दिल्लीसमोर 179 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. दिल्लीच्या विजयात शिखर धवनची 97 धावांची तुफानी खेळी निर्णायक ठरली. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 178 धावा केल्या होत्या.
दिल्लीकडून शिखर धवनने 63 चेंडून 97 धावांनी खेळी केली. तर रिषभ पंतने धवनला चांगली साथ दिली. रिषभने 31 चेंडूंत 46 धावां कुटल्या. सलामीवीर पृथ्वी शॉने 14, तर कॉलिन इनग्रामने 14 दावांची खेळी केली. कोलाकाताकडून प्रसिध कृष्णा, आंद्रे रसेल आणि नितेश राणाने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
त्याआधी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलाकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जो डेनली सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि रॉबी उथप्पाने कोलकाता सावरलं. शुभमन गिलने 39 चेंडूत 65 धावा केल्या. आंद्रे रसेलने आजही 21 चेंडूत 45 धावांची तुफानी खेळी केली. रॉबी उथप्पाने 28, नितेश राणा 11, पियुष चावलाने 14 धावांचं योगदान दिलं.
दिल्लीकडून गोलंदाजीत क्रिस मॉरिस, रबाडा, कीमो पॉलने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर इशांत शर्माने एक विकेट घेतली.