RCB Released Players : चर्चा मुंबई आणि गुजरातची, पण किंग कोहलीच्या आरसीबीमध्ये थेट 'सर्जिकल स्ट्राईक'! अनेकांवर कुऱ्हाड कोसळली
RCB Released Players : किंग विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) तब्बलर 11 खेळाडूंना रिलीज केले आहे. तसेच कोहली आयपीएल खेळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
RCB Released Players : आयपीएल 2024 मध्ये सर्वात मोठे बदल पाहण्यास मिळणार आहेत. किंग विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) तब्बलर 11 खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन ऍलन, मिचेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल आणि केदार जाधव यांचा समावेश आहे. तसेच किंग कोहली आयपीएल खेळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत सर्वाधिक पैसे आरसीबीच्या खात्यात असणार आहेत.
RCB have retained Dinesh Karthik. pic.twitter.com/YDyWoNfzxZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2023
गुजरातने कर्णधार पंड्याला कायम ठेवले
गुजरात टायटन्सने (GT) कर्णधार हार्दिक पांड्याला कायम ठेवले आहे. म्हणजेच पुढच्या मोसमात तो या संघासोबत खेळताना दिसणार आहे. गुजरातने आपल्या 8 खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप संगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ आणि दासुन सनाका यांचा समावेश आहे.
RCB have released Hasaranga, Hazlewood and Harshal Patel. pic.twitter.com/wGTzfLunqH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2023
केकेआरने संघातून 12 खेळाडूंना सोडले
कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आतापर्यंत सर्वाधिक 12 खेळाडू सोडले आहेत. यामध्ये शाकिब अल हसन, लिटन दास, डेव्हिड वेस, जॉन्सन चार्ल्स, लॉकी फर्ग्युसन आणि टीम साऊदी या विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय भारतीय खेळाडूंमध्ये आर्य देसाई, एन जगदीसन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा समावेश आहे.
RCB IS HAVING THE BIGGEST PURSE IN IPL 2024 AUCTION - 40.75cr. pic.twitter.com/wROzgd6k1h
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2023
कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी
चेन्नई संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोईन अली, शिवम दुबे, निशांत सिंधू, अजय मंडल, राजवर्धन हेंगगेकर, दीपक चहर, महिष तिक्षीना चौधरी, प्रशांत सौलंकी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे आणि मथिशा पाथीराना.
कोलकाता संघ : नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर, जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
पंजाब संघ : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम कुरान, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, गुरनूर सिंग ब्रार, शिवम सिंग, राहुल चहर, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, विदावथ कावेरप्पा, कागिसो रबाडा आणि नॅथन एलिस.
इतर महत्वाच्या बातम्या