फुटबॉलचा जबरा 'फॅन'; भारतीय तरुण सायकलने पोहोचला रशियात
इच्छा असेल तिथे मार्ग निघतो.. मात्र त्यासाठी चिकाटी, मेहनत आणि आवड या गोष्टी गरजेच्या असतात. केरळच्या क्लॅफिन फ्रान्सिस या तरुणानं हे सिद्ध केलं आहे.
![फुटबॉलचा जबरा 'फॅन'; भारतीय तरुण सायकलने पोहोचला रशियात Kerala Youth Cycles to Russia to Watch FIFA WORLD CUP Game LATEST UPDATE फुटबॉलचा जबरा 'फॅन'; भारतीय तरुण सायकलने पोहोचला रशियात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/19162919/cLAFIN-FRANSIS.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : इच्छा असेल तिथे मार्ग निघतो.. मात्र त्यासाठी चिकाटी, मेहनत आणि आवड या गोष्टी गरजेच्या असतात. केरळच्या क्लॅफिन फ्रान्सिस या तरुणानं हे सिद्ध केलं आहे. फुटबॉलप्रेमी फ्रान्सिसने फिफा वर्ल्ड कपची मॅच पाहण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पुरेसे पैसे नसल्याने त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
खर्चिक विमानप्रवास परवडणारा नसल्याने खचून न जाता फ्रान्सिसने सायकलवर रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. दुबईपर्यंतचा प्रवास त्याने विमानाने पूर्ण केला. दुबईत गेल्यानंतर एक सायकल खरेदी केली. पुढील 4 हजार किमीचा प्रवास यूएई, इराण, अझरबैजान मार्गाने त्याने रशिया गाठलं. दरम्यान इराण-यूएईचा प्रवास त्याने समुद्रमार्गे पूर्ण केला. रशियाला जॉर्जियामार्गे जाण्याया फ्रान्सिसने निर्णय घेतला होता, मात्र व्हिसा न मिळाल्याने त्याला अझरबैजान मार्गाने जावं लागलं.
रशियात पोहोचेपर्यंतच्या प्रवासादरम्यान सर्व देशातील अधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी मी भारतीय असल्याचे कळल्यावर मला मदत केली. तसेच प्रवासादरम्यान पैसे वाचवण्यासाठी हॉटेलमध्ये न राहता तंबूत राहत असल्याचं, फ्रान्सिसने सांगितले.
फ्रान्सिस अर्जेटिना संघाचा खूप मोठा फॅन आहे. फिफा वर्ल्ड कपचा सामना पाहण्याचं त्याचं लवकरच पूर्ण होणार आहे. वर्ल्ड कपमधील सामना पाहण्याचं माझं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मी फ्रान्स आणि डेन्मार्क यांच्यातील सामना पाहणार आहे. काही दिवस रशियात राहून त्यानंतर भारतात परतणार असल्याचे फ्रान्सिसने सांगितले. फ्रान्सिस या आठवड्यात मॉस्कोमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. याशिवाय त्याच्या आदर्श असलेल्या लिओनेल मेस्सीलाही भेटून सायकलवर त्याची सहीदेखील घेण्याची इच्छा आहे. फुटबॉलचा जबरा फॅन क्लॅफिन फ्रान्सिस सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)