एक्स्प्लोर

Junior Hockey World Cup : सातव्यांदा विजेतेपद पटकावण्यास जर्मनीला अपयश; अर्जेंटिनानं उडवला धुव्वा

Junior Hockey World Cup : ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं 4-2 अशा फरकानं जर्मनीचा पराभव केला आहे.

Junior Hockey World Cup : ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कपच्या (FIH Junior Men’s Hockey World Cup 2021) अंतिम सामन्यात जर्मनीवर मात करत अर्जेंटीनानं विजय मिळवला आहे. अर्जेंटिनानं जर्मनीला 4-2 च्या फरकानं पराभूत केलं. अर्जेंटिनानं दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. यापूर्वी 2005 मध्ये अर्जेंटिनानं किताब आपल्या नावे केला होता. तर जर्मनीनं यापूर्वी सहा वेळा हा किताब आपल्या नावे केला आहे. दरम्यान, यंदा सातव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या जर्मनीचं आव्हान अर्जेंटिनानं संपुष्टात आणलं. 

अर्जेंटिनानं जिंकला दुसरा विश्वचषक 

दुसऱ्यांदा ज्युनिअर हॉकी विश्वचषकाचा किताब आपल्या नावे करणारा तिसरा संघ ठरला आहे. जर्मनी (6 वेळा) व्यतिरिक्त भारतानं देखील 2001 आणि 2016 अशा दोन वेळा किताब आपल्या नावे केला आहे. या हॉकी विश्वचषकामध्ये फ्रान्सचा संघ तिसऱ्या आणि भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. भारताला सेमीफायनल्समध्ये जर्मनीकडून पराभवव पत्करावा लागला होता. त्यानंतर तिसऱ्या स्थानाच्या सामन्यातही भारताचा फ्रान्सनं पराभव केला. 

लोटारो डोमेननं डागले तीन गोल 

ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात लोटारो डोमेननं तीन गोल डागले. तिनही गोल त्यानं पेनल्टी कॉर्नरवर डागले. लोटारोला यासाठी अंतिम सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. फ्रँको एगोस्टोनिस्कोर्डनं अर्जेंटिनासाठी चौथा गोल डागला. जर्मनीसाठी ज्युलिअस हेनर आणि मासी फांन्टनं दोन गोल डागले. 

क्रमवारीत फ्रांस तिसऱ्या, तर भारत चौथ्या स्थानी 

यापूर्वी रविवारी फ्रान्सनं भारताला तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात 3-1 च्या फरकानं पराभूत केलं. फ्रान्सकडून कर्णधार टिमोथी क्लीमेंट स्टार खेळाडू ठरला. त्यानं भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात तीन गोल डागले. टिमोथीने 14 गोलांसह आपल्या विश्वचषक मोहिमेचा शेवट केला. त्याचवेळी सुदीपने भारतासाठी सामन्यातील एकमेव गोल केला. 

स्पर्धेत फ्रान्सविरोधातील 2 सामन्यांत पराभव 

या स्पर्धेतील फ्रान्सविरुद्ध भारतीय संघाचा हा दुसरा पराभव ठरला. याआधी, यावर्षी 24 नोव्हेंबर रोजी दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध विश्वचषक मोहीम सुरु केली होती. फ्रान्सनं हा सामना 5-4 अशा फरकानं जिंकला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या लाईव्हमध्ये, पाहण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षणVinod Kambli Raj Thackeray : दोन मिनिटं थांबले, राज ठाकरे विनोद कांबळींना आवर्जून भेटले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget