एक्स्प्लोर
Advertisement
यापुढेही जाडेजा आयसीसीच्या रडारवर राहणार!
या निलंबनानंतर जाडेजाच्या खात्यात 6 डिमेरिट पॉईंट (नकारात्मक गुण) जमा झाले आहेत. येत्या 24 महिन्यात हा आकडा 8 किंवा त्यापेक्षा अधिक झाला तर चार वेळा जाडेजावर निलंबनाची कारवाई केली जाईल.
कोलंबो : श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकणाऱ्या टीम इंडियाला पुढच्याच कसोटीपूर्वी मोठा धक्का बसला. कारण आयसीसीने कोलंबो कसोटीचा सामनावीर रवींद्र जाडेजावर अखिलाडूवृत्तीमुळे एका कसोटीसाठी निलंबनाची कारवाई केली आहे.
आयसीसीच्या या कारवाईची टांगती तलवार जाडेजावर यापुढेही नेहमी राहणार आहे. या निलंबनानंतर जाडेजाच्या खात्यात 6 डिमेरिट पॉईंट (नकारात्मक गुण) जमा झाले आहेत. येत्या 24 महिन्यात हा आकडा 8 किंवा त्यापेक्षा अधिक झाला तर जाडेजावर आणखी निलंबनाची कारवाई केली जाईल.
म्हणजेच चार अंक दोन कसोटीवर बंदी किंवा चार वन डे किंवा चार टी-20 खेळण्यासाठी बंदी घालण्यासमान असतात. कोलंबो कसोटीसह गेल्या 24 महिन्यात जाडेजाच्या नावावर 6 डिमेरिट पॉईंट जमा झाले होते. त्यानंतर आयसीसीने त्याच्यावर एका कसोटीसाठी निलंबनाची कारवाई केली.
कोलंबो कसोटीत जाडेजाने स्वत:च्या गोलंदाजीवर अडवलेला चेंडू फलंदाज करुणारत्नेच्या दिशेने अतिशय धोकादायक पद्धतीने थ्रो केला होता.
या प्रकरणात आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे जाडेजाला तीन दंड गुण आणि कसोटी मानधनाच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. पण गेल्या 24 महिन्यांत जाडेजाच्या बेशिस्त वर्तनासाठीच्या एकूण दंड गुणांची संख्या सहावर गेली. त्यामुळे आयसीसीच्या नियमावलीनुसार त्याच्यावर एका कसोटीतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement