एक्स्प्लोर
मेसीच्या डोळ्यात रक्ताचे अश्रू, ISISचा दहशतवादी हल्ल्याचा इशारा
आयसिसने जारी केलेल्या एका फोटोमध्ये मेसी एका तुरुंगात असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या डोळ्यांत रक्तांचे अश्रू दाखवण्यात आले आहेत.
मॉस्को : रशियात आयोजित फिफा विश्वचषक 2018 सुरु होण्यास काही महिन्यांचा अवधी असतानाच त्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट पसरलं आहे. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेसीचे विद्रुप फोटो शेअर करत 'आयसिस'ने भीती पसरवण्याचा प्रयत्न केला.
आयसिसने जारी केलेल्या एका फोटोमध्ये मेसी एका तुरुंगात असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या डोळ्यांत रक्तांचे अश्रू दाखवण्यात आले आहेत. 'ज्यांच्या डिक्शनरीमध्ये अपयश हा शब्द नाही, अशा संघटनेविरोधात तुम्ही लढा देत आहात' असा इशाराही पोस्टरवर देण्यात आला आहे.
https://twitter.com/siteintelgroup/status/922863797928329216
दुसऱ्या पोस्टरवर रशियातील फुटबॉल स्टेडियमबाहेर दहशतवादी निरीक्षण करताना दिसत आहे. अशा पोस्टर्सद्वारे आयसिसनं वर्ल्डकप दरम्यान दहशतवादी हल्ल्याचे संकेत दिले आहेत. आयसिसशी संबंधित 'वाफा फाऊंडेशन'ने ही पोस्टर्स जाहीर केली आहेत. नाईकीच्या 'जस्ट डू ईट'चं विडंबन करत 'जस्ट टेरेरिजम' अशी टॅगलाईनही देण्यात आली आहे.
https://twitter.com/Rita_Katz/status/922903526891810816
जून 2018 मध्ये रशियात फिफा वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. 11 शहरांमधील 12 स्टेडियम्सवर फुटबॉल सामने खेळवले जातील.
या इशाऱ्यांचं गांभीर्य तपासलं जात आहे. युरो 2016 आणि विमेन्स युरोपियन चॅम्पियनशीप 2017 च्या वेळीही आयसिसकडून दहशतवादी हल्ल्यांचा इशारा देण्यात आला होता, मात्र दोन्ही टूर्नामेंट सुरळीत पार पडल्या. आयसिस आणि फुटबॉल यांचं कनेक्शन यापूर्वी पाहायला मिळालं आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिसला सुरु असलेल्या फ्रान्स विरुद्ध जर्मनी सामन्यावेळी आयससिने हल्ला केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement