एक्स्प्लोर
Advertisement
हार्दिक पंड्याचा थ्रो, ईशान किशनला गंभीर दुखापत
हार्दिक पंड्याचा थ्रोनं मुंबईचा यष्टिरक्षक ईशान किशनच्या उजव्या डोळ्याखाली गंभीर दुखापत झाली.
मुंबई: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल खेळवण्यात आलेल्या सामन्यात एक अपघात झाला.
बंगलोरच्या डावातल्या तेराव्या षटकात हार्दिक पंड्याचा थ्रोनं मुंबईचा यष्टिरक्षक ईशान किशनच्या उजव्या डोळ्याखाली गंभीर दुखापत झाली.
पंड्याच्या एक टप्पा थ्रोवर चेंडू ईशान किशनच्या अपेक्षेपेक्षा अधिक उडाला आणि त्याच्या उजव्या डोळ्याजवळ आदळला.
ही घटना घडली त्यावेळी चेंडू ईशानच्या डोळ्यावरच आदळला असावा असा सर्वांचा समज झाला होता. त्यामुळं मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह प्रेक्षकांच्याही काळजाचा ठोका चुकला. पण काही वेळानं ईशानचा डोळा थोडक्यात वाचल्याचं लक्षात येताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
VIDEO:
मुंबईचा बंगलोरवर विजय रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या झुंजार खेळीनंतरही, वानखेडे स्टेडियमवरच्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सनं मोसमातला पहिला विजय साजरा केला. मुंबईनं या सामन्यात बंगलोरचा 46 धावांनी धुव्वा उडवला. कर्णधार रोहित शर्मा मुंबईच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितने घरच्या मैदानात अवघ्या 52 चेंडूंत दहा चौकार आणि पाच षटकारांसह 94 धावांची खेळी उभारली. रोहित आणि सलामीवीर एविन लुईसनं तिसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचली. त्यात लुईसचा वाटा 65 धावांचा होता. रोहित आणि लुईसच्या खेळीने मुंबईला 20 षटकांत सहा बाद 213 धावांची मजल मारून दिली. त्यानंतर बंगलोरला विजयासाठी 214 धावांचं आव्हान झेपलं नाही. विराट कोहलीनं 62 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 92 धावांची झुंजार खेळी उभारुनही बंगलोरला 8 बाद 167 धावांचीच मजल मारता आली. कोहलीच्या नावे नवा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराटनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं या सामन्यात 32 वी धाव घेऊन रैनाचा विक्रम मोडला. सुरेश रैनानं आयपीएलच्या 163 सामन्यांमध्ये 4558 धावांचा रतीब घातला आहे. विराटनं मुंबईविरुद्ध नाबाद 92 धावांची खेळी उभारली. त्यामुळं त्याच्या नावावर आता 153 सामन्यांमध्ये 4619 धावांचा इमला उभा राहिला आहे. त्यात 4 शतकं आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या मोसमातही विराट कोहली 4 सामन्यांमध्ये 201 धावा करून आघाडीवर आहे.Ishan Kishan injured #IPL2018 #IshanKishan pic.twitter.com/V6ahsR66d6
— Sachin Patil (@Imsachinp) April 18, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement