IPL 2022: युजवेंद्र चहलचा पराक्रम; आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही स्पिनरला जमलं नाही, पण त्यानं करून दाखवलं!
IPL 2022 Final: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा पराभव करून इतिहास रचला.
IPL 2022 Final: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा पराभव करून इतिहास रचला. आपल्या पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावलं. दरम्यान, राजस्थानचा तडाखेबाज फलंदाज जोस बटरलनं ऑरेंज कॅप जिंकली. तर, गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा राजस्थानचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal) 27 विकेट्स घेऊन पर्पल कॅप जिंकली. या कामगिरीसह युजवेंद्र चहलनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणार तो पहिला फिरकीपटू ठरलाय.
युजवेंद्र चहलचं दमदार प्रदर्शन
चहलने राजस्थान रॉयल्ससाठी 17 सामने खेळला. ज्यात 19.50 च्या सरासरीनं आणि 7.12 च्या इकॉनॉमी रेटनं 27 विकेट्स घेतले. चहल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा पहिला फिरकीपटू बनला आहे. त्याच्या आधी, इमरान ताहिरनं 2019 मध्ये चेन्नईकडून खेळताना 26 विकेट्स घेतले होते. युजवेंद्र चहलनं केवळ सर्वाधिक बळीच मिळवले नाहीत तर त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिकही घेतली.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे फिरकीपटू-
क्रमांक | फिरकीपटूंचं नाव | विकेट्स | वर्ष |
1 | युजवेंद्र चहल | 27 | 2022 |
2 | इम्रान ताहिर | 26 | 2019 |
3 | वानिंदू हसरंगा | 26 | 2022 |
4 | सुनील नरायण | 24 | 2012 |
5 | हरभजन सिंह | 24 | 2013 |
राजस्थानचा सात विकेट्सनं पराभव
आयपीएल 2022च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानच्या संघानं 20 षटकात 9 विकेट्स गमावून 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 18.1 षटकातचं राजस्थाननं दिलेलं लक्ष्य पूर्ण करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. या सामन्यात गुजरातकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर साई किशोरनं दोन विकेट्स मिळवल्या. तर, मोहम्मद शामी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली.
हे देखील वाचा-
- IPL 2022: हार्दिकचं उत्कृष्ट नेतृत्व, नेहराची रणनीती! गुजरातच्या विजयामागची पाच महत्वाची कारणं आली समोर
- IPL 2022: गुजरातनं ट्रॉफी जिंकल्यानंतर नताशा स्तांकोविक भावूक, भरमैदानात हार्दिकला मारली मिठी, पाहा व्हिडिओ
- IPL 2022 Final : हार्दिक पंड्याचा फायनल्समध्ये डंका; ठरला 'ही' कामगिरी करणारा तिसरा कर्णधार