एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

WTC 2023 : रहाणेनंतर रिद्धिमान साहाची टीम इंडियामध्ये एंट्री? केएल राहुलच्या जागी संधी मिळण्याची शक्यता, दमदार खेळीचं कोहलीकडूनही कौतुक

Wriddhiman Saha in IPL : गुजरातचा फलंदाज रिद्धिमान साहा दमदार फॉर्म पाहता अजिंक्य रहाणेप्रमाणेच साहाचीही टीम इंडियात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

GT vs LSG, Wriddhiman Saha in IPL : आयपीएलच्या (IPL 2023) 51 व्या सामन्यात गुजरातचा यष्टीरक्षक आणि फलंदाज रिद्धिमान साहाचा (Wriddhiman Saha) दमदार फॉर्म पाहायला मिळाला. रिद्धिमानच्या तुफान अर्धशतकी खेळीनं सर्वांचंच लक्ष वेधलं. साहाने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 43 चेंडूत 81 धावांची उत्कृष्ट खेळी केली. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. 

रहाणेनंतर रिद्धिमान साहाची टीम इंडियामध्ये एंट्री? 

लखनौ विरुद्धच्या सामन्याच रिद्धिमान साहाने वायूवेगाने धावा जमवल्या आणि गुजरात टायटन्सचा सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. विराट कोहलीनेही साहाच्या या खेळीचे कौतुक केलं आहे. रिद्धिमानचा हा दमदार फॉर्म पाहता अजिंक्य रहाणेप्रमाणेच साहाचीही टीम इंडियात पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण

आगामी काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. याआधी टीम इंडियावर टांगती तलवार आहे. टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. अनेक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला 1 मे रोजी इकाना स्टेडियमवरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधातील सामन्यादरम्यान जखमी झाली. त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये WTC अंतिम सामना

यानंतर राहुल आयपीएल 2023 मधून बाहेर पडला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दुखापतीमुळे केएल राहुलला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीलाही मुकावं लागणार आहे. लंडनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC चा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. 

WTC संघात रिद्धिमानला संधी मिळणार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. मात्र, केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून बाहेर पडल्यास त्याच्या जागी साहाला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साहा हा अनुभवी फलंदाज असून तो यष्टिरक्षणातही सक्षम आहे. WTC संघात केएस भरतचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे, पण साहाचा दमदार फॉर्म लक्षात घेता त्याला प्राधान्य दिलं जाऊ शकते. 

रिद्धिमानची आयपीएलमध्ये तुफान खेळी

आयपीएल 2023 मध्ये रिद्धिमान साहाने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 11 डावात 27.30 च्या सरासरीने आणि 137.18 च्या स्ट्राईक रेटने 273 धावा केल्या. त्यानं अर्धशतकही झळकावलं आहे.

विराट कोहलीनं केलं कौतुक

रिद्धिमान साहाच्या झंझावाती खेळीचं खूप कौतुक होत आहे. त्याला टीम इंडियातही स्थान मिळू शकतं, असं चाहत्यांपासून क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीही साहाच्या या खेळीचा फॅन झाला आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर साहाचा फोटो शेअर करून कौतुक केलं आहे. कोहलीने स्टोरीमध्ये लिहिलं, 'रिद्धिमान साहा काय खेळाडू आहे.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget