एक्स्प्लोर

महागड्या खेळाडूचा फ्लॉप शो, स्मृतीला 6 सामन्यात 100 धावाही करता आल्या नाहीत

Smriti Mandhana in WPL : स्मृती महिला आयपीएलमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली होती, पण तिला अद्याप आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही.

Smriti Mandhana in the WPL : महिला आयपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम सुरु आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीला लिलाव प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये भारताची सलामी फलंदाज स्मृती मंधानाला आरसीबीने कोट्यवधी रुपये खर्च करुन संघात घेतलं होतं. स्मृती महिला आयपीएलमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली होती, पण तिला अद्याप आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. सहा सामन्यात आरसीबीची कामगिरी तर हवी तशी झाली नाहीच. पण कर्णधार स्मृती मंधानाची बॅटही शांतच राहिली. स्मृतीला सहा सामन्यात 100 धावाही करता आल्या नाहीत. यामुळे स्मृती मंधानाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. 

स्मृतीची कामगिरी कशी राहिली ?

कोट्यवधी रुपयांना खरेदी केलेल्या स्मृतीला आरसीबीने कर्णधारपद दिलं. पण स्मृतीला फलंदाजी आणि नेतृत्वातही आपली चमक दाखवता आली नाही. आरसीबीला एकापाठोपाठ एक पराभवाचा सामना करावा लागला. त्यावेळी स्मृतीची कामगिरीही खालावलेली दिसली. सहा सामन्यात स्मृतीला 100 धावाही करता आल्या नाहीत. स्मृती मंधानाने सहा सामन्यात फक्त 14.6 च्या सरासरीने आणि 112 च्या स्ट्राईक रेटने फक्त 88 धावा केल्या आहेत. यादरम्यान स्मृतीची सर्वोच्च धावसंख्या 35 इतकी राहिली. सहा डावात तीन वेळा स्मृतीला दुहेरी संख्याही गाठता आली नाही. 

कुणाविरोधात किती धावा झळकावल्या ?
5 मार्च, दिल्ली कॅपिटल्स - 35 (23).
6 मार्च, मुंबई इंडियन्स - 23 (17).
8 मार्च, गुजरात जायंट्स- 18 (14).
10 मार्च, युपी- 4 (6).
13 मार्च, दिल्ली कॅपिटल्स - 8 (15).
15 मार्च, युपी - 0 (3).

एकूण धावसंख्या 88 
 
आरसीबीने कोट्यवधी केले खर्च -

वुमन्स प्रिमियर लीग या स्पर्धेपूर्वी सर्व खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. या लिलावात आरसीबीने स्मृती मंधानावर कोट्यवधी रुपये खर्च केले होते. आरसीबीने स्मृती मंधानाला 3 कोटी 40 लाख रुपये इतकी किंमत मोजून संघात घेतले होते. या स्मृती मंधाना लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली होती. महिला आयपीएल स्पर्धा अर्ध्यावर येऊन पोहचली आहे, पण स्मृती मंधानाला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. स्मृतीची कामगिरी तर खराब आहेच, पण आरसीबीला संघालाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. सहा सामन्यात आरसीबीला फक्त एक विजय मिळवता आलेला आहे. कागदावर ताकदवान दिसणारा आरसीबीचा संघ मैदानावर मात्र फ्लॉप होताना दिसत आहे. 

ही बातमी वाचायला विसरु नका 

WPL 2023 : दुष्टचक्र संपलं! सलग 5 पराभवानंतर अखेर आरसीबीचा विजय 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Anand Ashram Video : 19 वर्षांनी आनंदाश्रमात पहिलं पाऊल, राज ठाकरेंचा संपूर्ण व्हिडीओRaj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमातRaj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तकTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Embed widget