एक्स्प्लोर

IPL Mega Auction 2022: आयपीएलच्या ऑक्शनमध्ये शाकीब अल हसन अनसोल्ड का राहीला? कारण आलं समोर

IPL Mega Auction 2022: शाकिब हा सध्याच्या क्रिकेट विश्वातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातो.

IPL Mega Auction 2022:  आयपीएलच्या पंधराव्या हंगमासाठी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये बांगलादेशचा उत्कृष्ट ऑलराऊंडर शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) अनसोल्ड ठरला. ज्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होऊ लागले. तसेच शाकीब अल हसनचं अनसोल्ड राहण्यामागे अनेक तर्क वितर्क लावण्यात आले. याचदरम्यान, शाकीबची पत्नी उम्मे अहमद शिशिरनं (Umme Ahmed Shishir) फेसबूकवर एक पोस्ट केलीय. ज्यात तिनं शाकीब अनसोल्ड का ठरला? यामागचं कारण सांगितलंय.

शाकिब हा सध्याच्या क्रिकेट विश्वातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातो. यातच टी-20 क्रिकेटमध्ये त्याची आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. एवढेच नव्हे तर, टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत तो अव्वल क्रमांकावर आहे. मात्र, तरीही आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही फ्रँचायझीनं त्याच्यावर बोली का लावली नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता त्यामागचे कारण त्याच्या पत्नीनेच उघड केले आहे.

शाकिबच्या पत्नीची फेसबूक पोस्ट-

शाकीबची पत्नीनं केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की, उत्साहित होण्यापूर्वी सांगणं गरजेचं आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी अनेक फ्रँचायझींनी शाकीबसी संपर्क साधला होता. तसेच तो संपूर्ण हंगामात उपलब्ध राहू शकतो का? असं त्याला विचारण्यात आलं. परंतु, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमुळं त्याला शक्य नव्हत. त्यामुळं त्याला कोणत्याही फ्रँचायझींनी विकत घेतलं नाही. जर त्याची कोणत्या संघानं निवड केली असती तर, त्याला श्रीलंका दौऱ्याला मुकावं लागलं असतं. तो आयपीएलमध्ये खेळला असता तर, तुम्ही देशद्रोही ठरवलं असतं, असं तिनं म्हटलंय. तसेच तुमच्या उत्साहावर पाणी फिरवल्याबद्दल माफ करा, अशा शब्दात तिनं ट्रोल करणाऱ्यांना टोमणाही मारला आहे.

आयपीएलच्या मेगा ऑक्शन दोन दिवस चालले. या दोन दिवसांत 10 फ्रँचायझींनी 204 खेळाडूंना खरेदी केलंय. तर, एकूण 5,51,70,00,000 रुपये खर्च केले आहे. यावेळी 67 विदेशी खेळाडूंना दहा संघात खरेदी करण्यात आलंय. तर, 137 भारतीय खेळाडूंवर बोली लावण्यात आली. 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Embed widget