IPL दरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई! कोचसह 3 जणांची हकालपट्टी, टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय?
आयपीएल 2025 दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी कारवाई केली आहे.

Abhishek Nayar And T Dilip News : आयपीएल 2025 दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी कारवाई केली आहे. वृत्तानुसार, बोर्डाने गौतम गंभीरचे जवळचे सहकाऱ्यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात संपलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील खराब कामगिरी आणि ड्रेसिंग रूममधून लीक झालेल्या गोष्टी लक्षात घेऊन बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचलले आहे. अभिषेक नायर व्यतिरिक्त, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि प्रशिक्षक सोहम देसाई यांनाही संघातून काढून टाकण्यात आले आहे. अहवालानुसार, दोघेही 3 वर्षांहून अधिक काळ संघाशी जोडलेले होते. त्यामुळे नियमांनुसार आता त्यांच्या जागी नवीन भरती केली जाईल.
सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की, नायरच्या जागी कोणालाही नियुक्त केले जाणार नाही, कारण सीतांशु कोटक आधीच टीम इंडियाशी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडलेले आहेत. दिलीपचे काम सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्केट पाहतील. ट्रेनर सोहम देसाईची जागा एड्रियन ली रु घेईल, जो सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसोबत आहे. तो 2008 ते 2019 पर्यंत केकेआर संघासोबत होता, त्याने 2002 ते 2003 पर्यंत टीम इंडियासोबतही काम केले. त्याने बीसीसीआयसोबत करार केला आहे.
🚨 CHANGES IN INDIAN COACHING STAFF 🚨 [Abhishek Tripathi]
— Johns. (@CricCrazyJohns) April 17, 2025
- One of the reason behind is the poor performance in BGT
- Assistant Coach Abhishek Nayar is likely to be removed.
- Fielding Coach T Dilip & Trainer Soham has been relieved from the duties as they completed more than 3… pic.twitter.com/q6kpSNlOqS
भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 1-3 ने गमावली, या मालिकेत अश्विनने अचानक निवृत्ती घेतली. रोहित शर्माने सिडनी कसोटीतून स्वतःला बाहेर काढले होते, त्यानंतर संघात सर्व काही ठीक नसल्याची अटकळ बांधली जाऊ लागली. भारतीय ड्रेसिंग रूममधूनही बातम्या आल्या, ज्यामुळे हे प्रकरण आणखी तापले. एका सदस्याने बीसीसीआयकडे याबद्दल तक्रारही केली होती. याआधी, टीम इंडियाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध लज्जास्पद कामगिरी केली होती. न्यूझीलंडने कसोटी मालिकेत भारताचा 3-0 असा पराभव केला.
केंद्रीय करारातही होणार मोठे बदल
आयपीएल 2025 च्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीची बैठक झाली. यावेळी केंद्रीय कराराबद्दल सखोल चर्चा झाली. बैठकीनंतर दोन दिवसांनी, भारतीय महिला क्रिकेट संघाचे करार जाहीर करण्यात आले. पण पुरुष संघाचे करार अद्याप जाहीर झालेले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुष संघाच्या केंद्रीय करारात मोठे बदल दिसून येऊ शकतात. यामुळे, काही मोठी नावे वगळली जाऊ शकतात. त्याच वेळी, आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआय केंद्रीय कराराची घोषणा करू शकते.
हे ही वाचा -
DC vs RR : अक्षरबापूच्या दिल्लीनं सुपरओव्हरमध्ये मैदान मारलं, राजस्थान रॉयल्सला पराभवाचा धक्का





















