Virat Kohli : विराट कोहली बोले तो... षटकार, चौकाराचा बादशाह; आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात भीम पराक्रम
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या लीगमध्ये खेळणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंपैकी एक म्हणजे अनुभवी भारतीय फलंदाज विराट कोहली.

Virat Kohli RCB vs DC IPL 2025 : आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या लीगमध्ये खेळणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंपैकी एक म्हणजे अनुभवी भारतीय फलंदाज विराट कोहली. पहिल्या हंगामापासून विराटच्या बॅटने सातत्याने धावा काढल्या आहेत आणि अठराव्या हंगामातही हा ट्रेंड सुरूच आहे. आयपीएलमध्ये डझनभर विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या विराट कोहलीने आपल्या खात्यात आणखी एक विक्रम जमा केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार कोहलीने आयपीएलमध्ये 1000 चौकार-षटकार मारण्याचा विक्रम रचला आहे आणि तो असा विक्रम करणारा पहिला फलंदाज बनला आहे.
गुरुवार, 10 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने हा विक्रम केला. घरच्या मैदानावर हंगामातील त्यांचा दुसरा सामना खेळणाऱ्या बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी केली आणि पुन्हा एकदा फिल सॉल्टने विराट कोहलीसह त्यांना वादळी सुरुवात करून दिली. एकीकडे, सॉल्टने मिचेल स्टार्कवर चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला, तर विराटने दुसऱ्याच षटकात अक्षर पटेलवर चौकार मारला.
- 721 fours.
— Johns. (@CricCrazyJohns) April 10, 2025
- 279 sixes.
FIRST PLAYER IN IPL HISTORY TO COMPLETE 1000 BOUNDARIES - KING KOHLI 🐐 pic.twitter.com/gqunknVDM8
1000 चौकार-षटकार ठोकणारा पहिला फलंदाज
आता कोहलीच्या नावावर आणखी एक आयपीएल विक्रम जोडला. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलला डावातील तिसऱ्या चेंडूवर कोहलीने कव्हर्सवरून एक शानदार शॉट मारला आणि चेंडू थेट सीमा ओलांडून षटकार गेला. यासोबतच कोहलीने आयपीएलमध्ये त्याचे 1000 चौकार पूर्ण केले. कोहलीने आयपीएलच्या 249 डावांमध्ये हे 1000 षटकार आणि चौकार पूर्ण केले. एकूणच, कोहलीने आतापर्यंत 1001 चौकार मारले आहेत, ज्यात 280 षटकार आणि 721 चौकारांचा समावेश आहे.
कोहली या बाबतीत इतका पुढे आहे की दुसरा कोणताही फलंदाज त्याच्या जवळपासही नाही. कोहलीनंतर, दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणजे माजी भारतीय फलंदाज शिखर धवन, ज्याच्या नावावर 920 चौकार आहेत. डेव्हिड वॉर्नर (899) तिसऱ्या स्थानावर आहे आणि रोहित शर्मा (885) चौथ्या स्थानावर आहे. टॉप-5 बद्दल बोलायचे झाले तर, पाचवा फलंदाज ख्रिस गेल आहे, ज्याच्या बॅटने 761 चौकार मारले आहेत.
हे ही वाचा -





















