एक्स्प्लोर

RCB च्या पराभवानंतर चाहत्यांची पातळी घसरली, सिराजला शिवीगाळ, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

IPL 2022 : आरसीबीच्या चाहत्यांना पराभव पचवता येत नाही का? असा प्रश्न उपस्थित झालाय... कारण, राजस्थान विरोधात क्वालिफायर 2 मध्ये आरसीबीचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांनी सिराजला अश्लिल शब्दात शिवीगाळ केली.

Mohammed Siraj IPL 2022 : आरसीबीच्या चाहत्यांना पराभव पचवता येत नाही का? असा प्रश्न उपस्थित झालाय... कारण, राजस्थान विरोधात क्वालिफायर 2 मध्ये आरसीबीचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांनी सिराजला अश्लिल शब्दात शिवीगाळ केली. इतकेच नाही तर त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. क्वालिफायर दोन सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा सात गडी आणि 11 चेंडू राखून पराभव केला. या सामन्यात मोहम्मद सिराजला लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. नवख्या यशस्वी जायस्वालनेही सिरजाची गोलंदाजी फोडून काढली.. सिरजाच्या दोन षटकात राजस्थानने 30 पेक्षा जास्त धावा वसूल केल्या. त्यातच आरसीबीचा पराभव झाला..मग काय पराभवानंतर आरसीबीच्या चाहत्यांचा तोल ढासळला.. पराभवास सिराजच जबाबदार आहे, असे माणून त्याला शिवीगाळ केली. 

चाहत्यांनी खालच्या पातळीवर जात सिराजला शिवीगाळ केली. काही नेटकऱ्यांनी सिराजच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली.. खेळामध्ये कुणाचा तरी विजय अन् कुणाचा तरी पराभव होतोच.. पराभव मान्य करायला हवं. पण चाहत्यांना मात्र ते जमलेच नाही...चाहत्यांनी सिराजला त्याच्या इन्स्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अनेकांनी खालच्या पातळीवर शब्दांचा वापर करत सिराजला जबाबदार धरले...

पाहा नेटकरी काय म्हणाले.... 


आरसीबीच्या चाहत्यांनी खालच्या भाषेत शिवीगाळ केल्यानंतर क्रिकेटचे चाहते सिराजच्या सपोर्टसाठी धावून आले. अनेक चाहत्यांनी सिराजची पाठराखण केली. सोशल मीडियावर सिराजला खालच्या भाषेत ट्रोल करणाऱ्यांना सुनावलेय. काही जणांनी सिराजचा प्रवास कसा होता... याची आठवण करुन दिली.. तर काही नेटकऱ्यांनी गेल्या हंगामातील सिराजच्या कामगिरीची आठवण करुन दिली. 

दरम्यान, आरसीबीने तब्बल आठव्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. एलिमेनटर सामना जिंकून आरसीबीने फायनलच्या दिशेनं पाऊल टाकले होते. पण क्वालिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव केला. त्यामुळे यंदाच्या हंगामात आरसीबीचे आव्हान संपुष्टात आले. आरसीबीचा पराभव चाहत्यांना पचनी पडला नाही. त्यामुळे त्यांनी पराभवास सिराजला जबाबदार धरले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget