Gujarat Titans vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या सामन्यात, गुजरात टायटन्सने (GT) मुंबई इंडियन्सचा (MI) 6 धावांनी पराभव करून विजयासह हंगामाची सुरुवात केली. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने विजयाचे श्रेय आपल्या फिरकी गोलंदाजांना दिले.


सामन्यानंतर पहिल्यांदाच गुजरातचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, गोलंदाजी करताना मैदानात दव आल्यानंतरही खेळाडूंनी ज्या प्रकारे संयम राखला, तो विलक्षण होता. आमच्या फिरकीपटूंनी खूप चांगल्या प्रकार गोलंदाजी केली. याचकारणामुळे आम्ही सामन्यात कायम राहिलो. आम्ही मुंबई इंडियन्सच्या एका चुकीची वाटत पाहत होतो, ज्याची आम्हाला संधी घ्यायची होती, असं शुभमन गिलने सांगितले.


शुभमन गिलने साई सुदर्शनचेही कौतुक केले. साई सुदर्शनने संघासाठी महत्वाच्या 45 धावा केल्या. आम्ही 15 धावा कमी केल्या होत्या. शॉर्ट चेंडूंवर मारा करणे कठीण होते कारण ही विकेट संथ होत होती. शुभमन गिलने सामना पाहायला आलेल्या चाहत्यांचे देखील आभार मानले. दिवसा सामना असो की रात्री, प्रेक्षक नेहमीच मोठी उपस्थिती लावून आम्हाला पाठिंबा देतात, असं शुभमन गिल सामना जिंकल्यानंतर म्हणाला.


आगामी आयपीएलमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सला नवा कर्णधार मिळाला आहे. गुजरात टायटन्सचा माजी कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात परतला आहे, त्यामुळे संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. शुभमन गिलने मुंबईविरुद्ध पहिल्यांदाच गुजरातचं नेतृत्व केलं. शुभमन गिलने ज्या पद्धतीने कर्णधारपद हाताळलं, ते पाहता तो एक यशस्वी कर्णधार होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.






गुजरातने जिंकला सामना 


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 6 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक हारल्यानंतर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 168/6 धावा केल्या. साई सुदर्शनने संघासाठी 45 (39 चेंडू) सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 3 चौकार आणि 1 षटकार होता. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाला 20 षटकात 162/9 धावाच करता आल्या.


संबंधित बातम्या:


आशिष नेहराचा ते शब्द अन् 19 व्या षटकांत 2 विकेट्स; 10 कोटीत विकत घेतलेला स्पेन्सर जॉन्सन कोण?


IPL 2024 Latest Points Table: चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत राजस्थान रॉयल्स नंबर 1 वर; पाहा आयपीएलचे Latest Points Table


RCB vs PBKS Score Live IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार