MI Vs GT: IPL 2024: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला. गुजरातच्या माऱ्यापुढे मुंबईच्या (MI) फलंदाजांनी हाराकिरी केली. गुजरातने (GT) दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 162 धावांपर्यंत मजल मारली. 6 धावांनी गुजरातने मुंबईवर विजय मिळवला. 


रोहित शर्माला हटवून मुंबईचं कर्णधारपद हार्दिक पांड्याला दिल्यानंतर रोहितच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याचदरम्यान काल झालेल्या गुजरातविरुद्धच्या सामन्यातील रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


सदर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये रोहित आणि जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्यावर रागावले असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित आणि बुमराह हार्दिकवर एका गोष्टीवरून नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. षटकांच्या दरम्यान बुमराह हार्दिकशी काहीतरी चर्चा करत होता. या चर्चेत रोहितही सहभागी होतो आणि रोहित येताच पंड्या काहीतरी बोलून परत जाऊ लागला. निघताना रोहित हार्दिककडे बोट दाखवतो आणि काहीतरी बोलतो. रोहित, बुमराह आणि हार्दिकची ही चर्चा स्टंप माईकपासून दूर झाली. त्यामुळे गोष्टी ऐकू येत नव्हत्या. मात्र कोणत्यातरी गोष्टीवरुन रोहित आणि बुमराह हार्दिकवर नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.






रोहित शर्माला केले इग्नोर


ल्यूक वूड यानं 142 प्रति किमी वेगानं चेंडू टाकला होता. हा चेंडू वृद्धीमान साहा यानं डिफेंड केला, तो ल्यूक वूड याच्याकडेच आला. त्यानंतर रोहित शर्माला त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी आला होता. पण त्याआधीच ल्यूक वूड हा पाठ दाखवून गेला. ल्यूक वूड यानं रोहित शर्माकडे पाहिलेही नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसला. मुंबई संघाप्रमाणेच ल्यूक वूड यानं रोहित शर्माला इग्नोर केले, असा टोला केले. दरम्यान, याआधी हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा उडाल्या होत्या. त्यातच आता ल्यूक वूड यानं रोहित शर्माला इग्नोर केले. यावरुन चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केलाय. रोहित शर्माला मुंबईकडून हवा तसा सन्मान मिळत नसल्याचा आरोप चाहत्यांकडून करण्यात येत आहे.


संबंधित बातम्या:


आशिष नेहराचा ते शब्द अन् 19 व्या षटकांत 2 विकेट्स; 10 कोटीत विकत घेतलेला स्पेन्सर जॉन्सन कोण?


IPL 2024 Latest Points Table: चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत राजस्थान रॉयल्स नंबर 1 वर; पाहा आयपीएलचे Latest Points Table


RCB vs PBKS Score Live IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार