RCB vs PBKS Score Live IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार; पाहा दोघांची संभाव्य Playing XI

RCB vs PBKS Score Live IPL 2024: बंगळुरुमधील चिन्नास्वामीच्या मैदानात हा सामना रंगणार आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 25 Mar 2024 11:13 PM
आरीसीबाचा विजय

दिनेश कार्तिकने लावला विजयी चौकार.. आरसीबीने यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला

सामन्यात रोमांच वाढला

आरसीबीला विजयासाठी 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर फलंदाजी करत आहेत, तर अर्शदीप अखेरचं षटक घेऊन आलाय.

सामना रंगतदार स्थितीमध्ये

आरसीबीला विजयासाठी 12 चेंडूत 23 धावांची गरज

आरसीबीला लागोपाठ दोन धक्के

विराट कोहलीनंतर आरसीबीली आणखी एक धक्का बसला आहे. अनुज रावत 11 धावांवर बाद झाला आहे. आरसीबीला विजयासाठी 22 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. 

आरसीबीला मोठा धक्का

विराट कोहलीच्या रुपाने आरसीबीला पाचवा धक्का बसला आहे. विराट कोहली 77 धावांवर बाद झाला आहे. आरसीबीला विजयासाठी 24 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. 

सामना रंगतदार अवस्थेत

पंजाब आणि आरसीबी यांच्यातील सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे.  आरसीबीला विजयासाठी 25 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. विराट कोहली 77 धावांवर खेळत आहे. 

पंजाबची 176 धावांपर्यंत मजल

शशांक सिंह याने अखेरच्या षटकात 20 धावा चोपल्या. पंजाबच्या संघाने 20 षटकात 176 धावांपर्यंत मजल मारली आहे. 

पंजाबला सहावा धक्का

पंजाबला सहावा धक्का बसला आहे. जितेश शर्मा 26 धावांवर बाद झाला.  मोहम्मद सिराजने घेतली विकेट

पंजाबचा अर्धा संघ तंबूत

अनुज रावत यानं विकेटच्या मागे शानदार झेल घेतला. सॅम करन 23 धावा काढून बाद झाला. यश दयाल यानं घेतली विकेट

शिखर धवनचं अर्धशतक हुकलं

शिखर धवन यानं कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. शिखर धवन यानं 45 धावांची खेळी केली. पाच धावांनी त्याचं शतक हुकलं. शिखर धवन याला ग्लेन मॅक्सवेल यानं बाद केले. 

पंजाबला तिसरा धक्का

लियाम लिव्हिंगस्टोन 17 धावांवर बाद झालाय. अल्जारी जोसेफ यानं पंजाबला दिला तिसरा धक्का

पंजाबला दुसरा धक्का

ग्लेन मॅक्सवेलने प्रभसिमरनला बाद करत पंजाबला दिला दुसरा धक्का. प्रभसिमरन 17 चेंडूमध्ये 25 धावा काढून बाद झालाय. पंजाब 2 बाद 72 धावा

पंजाबची सावध सुरुवात - 

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने सावध सुरुवात केली. पंजाबने सहा षटकांमध्ये एक बाद 40 धावा केल्या आहेत. शिखर धवन 21 आणि प्रभसिमरन 10 धावांवर खेळत आहे. जॉनी बेयरस्टोला सिराजने 8 धावांवर बाद केले.

पंजाबला पहिला धक्का

मोहम्मद सिराजने पंजाबला पहिला धक्का दिला. लागोपाठ दोन चौकार मारल्यानंतर सिराजने जॉनी बेयरस्टोला पाठवलं तंबूत.. विराट कोहलीने घेतला झेल.

पंजाबसाठी शानदार सुरुवात

शिखर धवन आणि जॉनी बेअयरस्टो यांनी वेगवान सुरुवात केली आहे. सिराजच्या दोन्ही षटकात धावांचा पाऊस पाडलाय. 

पंजाबचे 11 किंग्स कोणते ?

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअयरस्टो, प्रभसिमरन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंह, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर


राखीव खेळाडू (इम्पॅक्ट) - अर्शदीप सिंह, रायली रुसो, तनय टी, हरप्रीत भाटिया, 

आरसीबीचे 11 शिलेदार कोणते ? 

फाफ डु प्लिसेस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), अल्जारी जोसेफ, मयांक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

आरसीबीनं नाणेफेक जिंकली

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाब प्रथम फलंदाजीसाठी उतरणार

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहली सज्ज

आरसीबीवर पंजाब किंग्सचा वरचष्मा-

आयपीएलमधील दोन संघांमधील स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या 5 सामन्यांमध्ये पंजाबचा वरचष्मा दिसत आहे. या दोन्ही संघांमधील मागील 5 सामन्यांमध्ये पंजाब संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे. तर आरसीबीने 2 सामने जिंकले आहेत.
एकूण रेकॉर्डवर नजर टाकली तर यातही पंजाबचाच वरचष्मा दिसतो. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत पंजाबने 17 सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने 14 सामने जिंकले आहेत.

ग्लेन मॅक्सवेलची सरावात तुफान फटकेबाजी

पंजाबच्या खेळाडूंनी चाहत्यांना दिल्या होळीच्या शुभेच्छा

11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल

बंगळुरूची खेळपट्टी कशी असेल?

आरसीबीच्या फिरकीपटूंना वेगवान आउटफिल्डवर कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल. या मैदानावर बहुतेक प्रसंगी संघाने एका डावात 200 हून अधिक धावा केल्या आहेत आणि हे 27 वेळा घडले आहे. या खेळपट्टीवर आयपीएलमधील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 172 आहे. यामुळे आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांनाही पंजाब किंग्सविरुद्ध जबाबदारीने खेळावे लागणार आहे. 

पाहा, दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, अनुज रावत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, रीस टोपली/अल्झारी जोसेफ, कर्ण शर्मा, मयंक डागर, मोहम्मद सिराज. इम्पॅक्ट प्लेयर: यश दयाल.


पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग. इम्पॅक्ट प्लेयर: प्रभसिमरन सिंग.

पाहा आयपीएलची सध्याची गुणतालिका

पार्श्वभूमी

RCB vs PBKS IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामीच्या मैदानात हा सामना रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) यंदाच्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळला. या सामन्यात चेन्नईने बंगळुरुचा पराभव केला. तर पंजाब किंग्सने पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला. या सामन्यात पंजबाने दिल्लीला पराभूत केले. आज दोघांमध्ये सामना रंगणार असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार हे महत्वाचं ठरणार आहे. 






 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.