IPL 2024 Latest Points Table: चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत राजस्थान रॉयल्स नंबर 1 वर; पाहा आयपीएलचे Latest Points Table
IPL 2024 Latest Points Table: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सनं अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा (Gujarat Titans vs Mumbai) सहा धावांनी पराभव केला आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. (Image Source: IPL )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरातच्या माऱ्यापुढे मुंबईच्या (MI First Match) फलंदाजांनी हाराकिरी केली. गुजरातने (GT) दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 162 धावांपर्यंत मजल मारली. (Image Source: IPL )
गुजरातने अखेरच्या तीन षटकांमध्ये सामना फिरवला. या पराभवासह मुंबईने 2013 पासूनची परंपरा कायम राखली. मागील 11 वर्षांमध्ये मुंबईला आयपीएलच्या हंगामातील आपला पहिला सामना जिंकताच आला नाही. (Image Source: IPL )
विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी अतिशय तगडी गोलंदाजी केली. या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 20 धावांनी पराभव केला होता. (Image Source: IPL )
राजस्थान विरुद्ध लखनौ आणि गुजरात विरुद्ध मुंबईच्या सामन्यानंतर आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत (Points Table) मध्ये मोठा बदल झाला आहे. (Image Source: IPL )
गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सने मागे टाकरत अव्वल स्थान पटकावले आहे. (Image Source: IPL )
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर असून त्यांचे सध्या 2 गुण आहेत. संघाचा नेट रनरेट +1.000 आहे. चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांचेही 2 गुण आहेत आणि नेट रनरेट +0.779 आहे. (Image Source: IPL )
तिसऱ्या स्थानावर असलेल्या पंजाब किंग्सचेही 2 गुण आहेत. पंजाबचा नेट रनरेट सध्या +0.455 आहे. मुंबई्विरुद्ध कालचा सामना जिंकल्यानंतर, गुजरात जायंट्सचे 2 गुण झाले आहेत, आणि त्यांचा नेट रनरेट +0.300 असल्यामुळे ते चौथ्या स्थानावर आहेत. (Image Source: IPL )
कोलकाता सध्या 2 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे आणि या संघाचा नेट रनरेट +0.200 आहे. इतर 5 संघांचे सध्या 0 गुण आहेत. (Image Source: IPL )
आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. पंजाबने त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्लीचा 4 गडी राखून पराभव केला होता आणि आता बेंगळुरूचा पराभव करून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचू शकतात. (Image Source: IPL )
दुसरीकडे, आरसीबीला त्यांच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 6 गडी राखून मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे फाफ डू प्लेसिस आणि त्यांची सेना पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. (Image Source: IPL )
पाहा आयपीएलची सध्याची गुणतालिका (Image Source: IPL )