IPL 2022: धाकड फलंदाजाची मुंबईच्या संघात एन्ट्री, राजस्थानविरुद्ध सामन्यात उतरणार मैदानात
दुखापतीमुळं त्याला दिल्लीविरुद्ध सामन्यातून मुकावं लागलं. दुखापतीतून पूर्णपणे बरे झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या बायो-बबलमध्ये पोहोचण्यासाठी त्यानं बुधवारी त्याचा क्वारंटाईनचा कालावधी संपवलाय.
IPL 2022: मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू सुर्यकुमार यादवची संघात एन्ट्री झाली आहे. दुखापतीमुळं त्याला दिल्लीविरुद्ध सामन्यातून मुकावं लागलं होतं. दुखापतीतून पूर्णपणे बरे झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या बायो-बबलमध्ये पोहोचण्यासाठी त्यानं बुधवारी त्याचा क्वारंटाईनचा कालावधी संपवलाय. त्यानंतर त्यानं संघातील इतर खेळाडूंसोबत जिम सेशनमध्येही भाग घेतला.
सूर्यकुमार यादवला गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत दुखापत झाली होती. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. गेल्या काही आठवड्यांपासून तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन करत होता. वेळेत दुखापतीतून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे तो दिल्लीविरुद्ध मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकला नाही. मात्र, राजस्थानविरुद्धच्या पुढील सामन्यात मुंबईच्या संघाचा भाग असेल, अशी माहिती मिळत आहे.
"सूर्यकुमार यादव त्याचा अलग ठेवण्याचा कालावधी संपल्यानंतर बुधवारी संघात सामील झाला. त्यानं संघातील सहकारी खेळाडू कायरन पोलार्ड, इशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांच्यासोबत जिम सेशन केलं. ज्यामुळं मुंबईच्या संघात उत्साहाचं वातावरण आहे". मुंबईच्या संघानं गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात, अशी माहिती दिली आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुबईच्या संघाला दिल्लीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघासमोर 178 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. परंतु, दिल्लीच्या ललित यादव आणि अक्षर पटेल सातव्या विकेट्ससठी 30 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी केली. ज्यामुळं दिल्लीनं हा सामना चार विकेट्सनं जिंकला होता.
हे देखील वाचा-
- ना निवृत्तीचा, ना वाढत्या वयाचा फरक, धोनीची कमाई 30 टक्केंनी वाढली, 38 कोटींचा भरला कर
- TATA IPL: आयपीएल 2022 मध्ये 'या' अनकॅप्ड खेळाडूंची चमकदार कामगिरी, भारतीय संघात स्थान मिळणार?
- IPL 2022, KKR vs RCB : आरसीबीकडून पराभवानंतरही केकेआरच्या 'फायटींग' खेळीवर कर्णधार श्रेयस खुश, म्हणाला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha