PBKS vs SRH : अखेरच्या षटकात शशांक-आशुतोषने 26 धावा चोपल्या, तरीही पंजाबचा पराभवच, 2 धावांनी हैदराबादचा विजय
PBKS vs SRH, IPL 2024 : रोमांचक सामन्यात हैदराबादने पंजाबचा 2 धावांनी पराभव केला. शशांक सिंह आणि आशुतोष अषुतोष शर्मा यांच्या झंझावती खेळीनंतरही पंजाबला विजय मिळवता आला नाही.
PBKS vs SRH, IPL 2024 : रोमांचक सामन्यात हैदराबादने पंजाबचा 2 धावांनी (PBKS vs SRH) पराभव केला. शशांक सिंह आणि आशुतोष अषुतोष शर्मा यांच्या झंझावती खेळीनंतरही पंजाबला विजय मिळवता आला नाही. अखेरच्या षटकात पंजाबने 26 धावा वसूल केल्या, तरीही पंजाबला पराभवाचाच सामना करावा लागला. हैदराबादने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 180 धावांपर्यंत मजल मारु शकला. अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी 29 धावांची गरज होती. हैदराबादकडून अखेरचं षटक जयदेव उनादकट यानं फेकलं. शशांक सिंह आणि आशुतोष यांनी विस्फोटक फंलदाजी करत विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पण फक्त दोन धावांनी पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. शशांकने अखेरच्या चेंडूवर षटकारही मारला, तरीही तो विजय मिळवून देऊ शकला नाही.
सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करतना निर्धारित 20 षटकांमध्ये 182 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्यत्तरदाखल धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबची सुरुवात अतिशय खराब झाली. फक्त 20 धावांत तीन फलंदाज तंबूत परतले होते. सॅम करन आणि सिकंदर रजा यांनी पंजाबचा डाव सावरला. दोघांनी अनुक्रमे 29 आणि 28 धावांचे योगदान दिले. गुजरातविरोधात पंजाबला विजय मिळवून देणाऱ्या शशांकने पुन्हा एकदा शानदार खेळी केली. त्याला आशुतोष यानं शानदार साथ दिली, पण ते पंजाबला विजय मिळवून देऊ शकले नाही. थरारक सामन्यात हैदराबादने पंजाबचा 2 धावांनी पराभव केला.
अखेरच्या षटकाचा थरार पाहाच.....
A Fantastic Finish 🔥
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2024
Plenty happened in this nail-biter of a finish where the two teams battled till the end🤜🤛
Relive 📽️ some of the drama from the final over ft. Jaydev Unadkat, Ashutosh Sharma & Shashank Singh 👌
Watch the match LIVE on @starsportsindia and @JioCinema… pic.twitter.com/NohAD2fdnI
183 धावांचा पाठलाग कऱणाऱ्या पंजाबची अवस्था दैयनीय झाली होती. अखेरच्या पाच षटकांत पंजाबला विजयासाठी 78 धावांची गरज होती. धावगती वाढल्यामुळे दबावात आलेला जितेश शर्मा षटकार मारुन 16 व्या षटकात तंबूत परतला. जितेश शर्मा यानं 11 चेंडूत 19 धावांची खेळी केली. पुढील दोन षटकात पंजाबने 28 धावा वसूल केल्या खऱ्या पण लक्ष अजून खूप दूर होतं. अखेरच्या 18 चेंडूवर पंजाबला विजयासाठी 50 धावांची गरज होती. मैदानावर शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा ही जोडी होती. या जोडीने पंजाबच्या विजयासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
A tough loss, but a night to remember for the boys! 💪
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 9, 2024
Only onwards and upwards from here. 🙌#SaddaPunjab #PunjabKings #JazbaHaiPunjabi #TATAIPL2024 #PBKSvSRH pic.twitter.com/7QzzgxVu2E
अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी 29 धावांची गरज होती. शशांक सिंह याला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळालेच, पण तो चेंडू सीमापार गेला. पहिल्याच चेंडूवर आशुतोष याला सहा धावा मिळाल्या. त्यानंतर जयदेवनं लागोपाठ दोन चेंडू वाईड फेकले. त्यानंतर पुन्हा एकदा षटकार दिला.. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूवर आशुतोषने दोन दोन धावा काढल्या. त्यानंतर उनादकटने पुन्हा वाईड चेंडू फेकला. उनादकट यानं चार चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्या. अखेरच्या दोन चेंडूवर पंजाबला दहा धावांची गरज होती. पण आषुतोष शर्मा याला पाचव्या चेंडूवर फक्त एक धाव काढता आली. अखेरच्या चेंडूवर शशांकने षटकार मारला खरा पण सामना हैदराबादने दोन धावांनी खिशात घातला. शशांक सिंह 46 धावांवर नाबाद राहिला तर आशुतोष 33 धावांवर नाबाद राहिला.