(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हेटमायरच्या पत्नीबाबत गावसकरांचे वादग्रस्त वक्तव्य, नेटकरी भडकले
IPL 2022 : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचक आणि माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय.
Sunil Gavaskar Controversy Shimron Hetmyer Rajasthan Royals IPL 2022 : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचक आणि माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय. राजस्थानचा स्टार खेळाडू शिमरोन हेटमायरच्या पत्नीबाबात गावसकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय. त्यावरुन गावसकर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. गावसकरांना समालोचकपदावरुन काढून टाकण्याची काही नेटकऱ्यांनी मागणी केली आहे.
पत्नी बाळाला जन्म देणार होती, म्हणून शिमरोन हेटमायर मायदेशी परतला होता. आता हेटमायर आयपीएलसाठी भारतात परतला. शुक्रवारी चेन्नईविरोधात झालेल्या सामन्यात राजस्थान संघात हेटमायरचे पुनरागमन झाले. यावेळी गावसकरांनी वादग्रस्त वक्तव्य केले. राजस्थानला विजयासाठी 52 चेंडूत 75 धावांची गरज होती. त्यावेळी राजस्थानकडून क्रीझवर फलंदाजीला हेटमायर आला. तेव्हा गावसकर यांनी त्यांच्यासाठी असे काही शब्द वापरले ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. गावसकर म्हणाले, शिमरन हेटमायरच्या पत्नीची प्रसूती झाली आहे. हेटमायर आता राजस्थानसाठी डिलिव्हरी करेल का?
वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गावसकरांना ट्रोल केले. अनेकांनी आपला राग व्यक्त केला.
Sunil Gavaskar said, "Shimron Hetmyer's wife has delivered, will he deliver now for the Royals".
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 20, 2022
Sunny G comments is more worst than this year’s umpiring 😠 #CSKvsRR #SunilGavaskar
— J🍁 (@jenzbenzy) May 20, 2022
We’ve had enough of #SunilGavaskar’s commentary. So cringe and utterly bad to the core. @BCCI @IPL
— Shouri Piratla (@ShouriPiratla) May 20, 2022
There must be better commentators than Sunil Gavaskar. #BanSunilGavaskarFromCommentating
— Deep Mistry (@deep_mistry1899) May 20, 2022
#SunilGavaskar Sir, in a professional game why would you try to be funny by commenting about other's wife? @Hetmyer7 @imVkohli #IPL2022 #RRvsCSK
— Vinay (@VinayB_N) May 20, 2022
राजस्थान संघाने अखेरच्या साखळी सामन्यात अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थानने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. अश्विनने गोलंदाजीत महत्वाची एक विकेट घेतली तर फलंदाजीमध्ये नाबाद 40 धावांची खेळी केली. चेन्नईने दिलेले 151 धावांचे आव्हान चेन्नईने पाच गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पार केले. या विजयासह राजस्थानच्या संघाने गुणतालिकेत टॉप 2 मध्ये प्रवेश केलाय. 24 मे रोजी राजस्थान आणि गुजरात संघामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे.