एक्स्प्लोर

SRH vs DC IPL 2025: चल...निघ, निघ...; दिल्लीचा फलंदाज बाद होताच काव्या मारनचं आक्रमक सेलिब्रेशन; VIDEO

SRH vs DC IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात काल (5 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला.

SRH vs DC IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात काल (5 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भेदक गोलंदाजी केली. अवघ्या 29 धावांवर दिल्लीने 5 विकेट्स गमावल्या होत्या. यादरम्यान दिल्लीचा फलंदाज विप्राज निगम बाद होताच हैदराबाद संघाची मालकीण काव्य मारनने केलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

दिल्लीला विप्राज निगमच्या रूपात 62 धावांवर सहावा धक्का बसला. विप्राज निगम बाद होताच काव्या मारनने आक्रमक शैलीत सेलिब्रेशन केले.  13 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विपराज निगम (१८) अनिकेत वर्माने धावबाद केला. त्याआधी, करुण नायर (0), फाफ डू प्लेसिस (3), अभिषेक पोरेल (8), केएल राहुल (10) आणि अक्षर पटेल (6) धावांवर बाद झाला. 

काव्या मारनचे आक्रमक सेलिब्रेशन, VIDEO:

विप्राज निगम धावबाद झाल्यावर काव्या मारनने आक्रमक शैलीत सेलिब्रेशन केले. विप्राज निगम बाद झाल्यानंतर दिल्लीचा संघ 100 धावांवरच बाद होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु दिल्लीच्या ट्रिस्टन स्टब्स 41 धावा आणि आशुतोष शर्माने 41 धावा करत संघाला 133 धावांवर पोहचवले. 

हैदराबाद आयपीएल 2025 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर-

पावसामुळे सनरायझर्स हैदराबादचा डाव सुरू होऊ शकला नाही, सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले. गेल्या वर्षीचा उपविजेता हैदराबाद या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला तिसरा संघ बनला आहे. हैदराबादने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांपैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत आणि 7 सामने गमावले आहेत.

हैदराबाद सहाव्यांदा लीगच्या टप्प्यातून बाहेर-

2013 पासून आयपीएलमध्ये खेळत असलेला सनरायझर्स हैदराबाद सहाव्यांदा लीग टप्प्यातून बाहेर पडला आहे. 2013 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर, संघ सलग दोनदा लीग टप्प्यातून बाहेर पडला. 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नरने संघाला पहिले विजेतेपद मिळवून दिले. यानंतर, हैदराबादचा संघ 2017 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचला आणि 2018 मध्ये उपविजेता ठरला. हैदराबादचा संघ 2019 आणि 2020 मध्ये प्लेऑफमध्ये पोहचला होता. परंतु त्यानंतर सलग तीन वेळा तो लीग टप्प्यातून बाहेर पडला. गेल्या वर्षी (२०२४) पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु केकेआरकडून पराभव पत्करल्यानंतर त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावर्षी पुन्हा एकदा हैदराबादचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. 

संबंधित बातमी:

IPL 2025 Points Table SRH vs DC : मैदानात पावसाचे पाणीच पाणी अन् काव्या मारनचा संघ आयपीएलमधून बाहेर... प्लेऑफचे समीकरण झाले रंजक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget