(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : फक्त 59 धावांत गारद, लाजीरवाण्या पराभवानंतर राजस्थानच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
राजस्थानच्या नऊ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.. चार फलंदाज तर भोपळाही फोडू शकले नाहीत.
RR vs RCB, IPL 2023 : करो या मरो या लढतीत आरसीबीने ११२ धावांनी विजय मिळवला आहे. आरसीबीच्या गोलंदाजीपुढे राजस्थानच्या फलंदाजांनी हराकिरी केली. राजस्थानचा डाव अवघ्या 59 धावांत संपुष्टात आला. हेटमायरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने झुंज दिली नाही. 172 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 10.3 षटकात 59 धावांत संपुष्टात आला. वेन पार्नेल याने तीन विकेट घेतल्या.. आरसीबीने एकतर्फी विजय मिळवत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय. करो या मरो च्या लढतीत आरसीबीने ११२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आरसीबीच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. त्याशिवाय फक्त दोन फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली. राजस्थानचे प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. राजस्थानचे प्ले ऑफमध्ये पोहचण्याची संधी फक्त ११ टक्के आहे. आजच्या दारुण पराभवानंतर राजस्थानच्या नावावर काही नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
राजस्थानच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड -
लाजीवारवाण्या पराभवानंतर राजस्तथान रॉयल्सने काही नकोसे विक्रम नावावर केले आहेत. राजस्थानचा संघ अवघ्या ५९ धावांवर संपुष्टात आलाय. आयपीएलच्या इतिहासात राजस्थानची ही दुसरी निचांकी धावसंख्या आहे. याआधी २००९ मध्ये आरसीबीच्याच विरोधात राजस्थानचा संघ फक्त ५८ धावांत गारद झाला होता. आयपीएलच्या इतिहासात राजस्थानची आजची निचांकी धावसंख्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आरसीबी संघाचे नाव आहे. २०१७ मध्ये आरसीबीचा संघ कोलकात्याच्या गोलंदाजीपुढे ४९ धावांवर गारद झाला होता. २००९ मध्ये राजस्थानचा संघ आरसीबीच्या गोलंदाजीपुढे ५८ धावांपर्यंत मजल मारु शकला. आज राजस्थानचा संघ ५९ धावांत गारद झाला.
राजस्थान रॉयल्स संघाची आतापर्यंतची निचांकी धावसंख्या
58 vs रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, केप टाउन, 2009
59 vs रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, जयपुर, आज
81 vs कोलकाता नाइट रायडर्स, कोलकाता, 2011
85 vs कोलकाता नाइट रायडर्स, शारजाह, 2021
आयपीएलच्या इतिहासातील निचांकी धावसंख्या -
49 - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर vs कोलकाता नाइट रायडर्स, कोलकाता, 2017
58 - राजस्थान रॉयल्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, केप टाउन, 2009
59 - राजस्थान रॉयल्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, जयपुर, आज
66 - दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स, दिल्ली, 2017
Lowest IPL totals in history.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 14, 2023
RCB bowlers twice in the Top 4. pic.twitter.com/zyzOi4vEAh
What a crazy scorecard!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 14, 2023
RCB bowlers completely rocked today! pic.twitter.com/DPdBQBixL5