पर्यटनासाठी गेलेल्या डॉक्टरचा बुडून मृत्यू, वाचवण्यासाठी गेलेला तरुणही बुडाला, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं
पुणे (Pune) जिल्ह्यातील भिमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना घडली आहे. सहा डॉक्टरांची टीम फिरायला गेली होती. यावेळी एका डॉक्टरचा बुडून मृत्यू झाला आहे.
Pune : पुणे (Pune) जिल्ह्यातील भिमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना घडली आहे. सहा डॉक्टरांची टीम फिरायला गेली होती. यावेळी एका डॉक्टरचा बुडून मृत्यू झाला आहे. सुबोध करंडे असं या डॉक्टरचं नाव आहे. सुबोध करंडे या बुडणाऱ्या डॉक्टरला वाचवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाचा देखील बुडून मृत्यू झाला आहे. दिलीप वनघरे असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीनं देवकुंडात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
पुणे जिल्ह्यातील भिमाशंकरजवळ आज धक्कादायक घटना घडली आहे. फिरयला गेलेल्या डॉक्टरचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर बुडलेल्या डॉक्टरला वाचवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुबोध करंडे असं मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
कुंडेश्वर इथं दर्शनाला जाताना भीषण अपघात, 7 महिलांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्ताने शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात भीमाशंकर हे मोठे ज्योतिर्लिंग असल्याने येथेही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत आहेत. त्यासोबतच, अनेक शिव मंदिराकडे वाहनांच्या व भाविकांच्या रांगा दिसून येतात. दरम्यान, भीषण अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. जिल्ह्याच्या खेड (pune) तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनाला जाताना भीषण अपघात झाला असून या दुर्दैवी घटनेत 7 महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 महिला भाविक जखमी झाल्या आहेत. साधारणत: दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारासचा हा अपघात घडल्याची माहिती आहे.
कल्याण-पुणे एसटी बसचे चाक निखल्यानेही अपघात
कल्याणवरुन माळशेजमार्गे पुणे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला आज सकाळी मोठा अपघात झाला. कल्याणपासून काही अंतरावर बसचे चाक अचानक निखळल्याने गोंधळ उडाला. या दुर्घटनेत 3 ते 4 प्रवाशांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले आहेत. बसमध्ये अपघातावेळी 40 पेक्षा अधिक प्रवासी होते. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस माळशेज घाटापूर्वीच थांबल्याने मोठा अनर्थ टळला. जर, हा प्रकार घाटामध्ये झाला असता, तर गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे, अनेकांचा जीव भांड्यात पडला. बसमधील जखमी प्रवाशांना किरकोळ मार लागल्याने प्रवाशी दुसऱ्या एसटी बसमध्ये बसून पुढे रवाना झाल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या:

























