एक्स्प्लोर

RR Vs LSG Top 10 Key Points: लखनौचा पराभव, राजस्थाननं 3 धावांनी सामना जिंकला, वाचा सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे  

RR Vs LSG, IPL 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या वीसाव्या सामन्यात राजस्थाननं लखनौला 3 धावांनी पराभूत केलं आहे.

RR Vs LSG, IPL 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या वीसाव्या सामन्यात राजस्थाननं लखनौला 3 धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाला 162 धावापर्यंत मजल मारता आली.

- राजस्थान आणि लखौन यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 20 वा सामना खेळण्यात आला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना खेळण्यात आला. 

- मुंबईच्या वानखेडे मैदानावर संध्याकाळी दव पडतात. ज्यामुळं प्रत्येक संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. या सामन्यातही नाणेफेक जिंकून लखनौचा कर्णधार केएल राहुलनं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. 

- नाणेफेक गमावून फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर देवदत्त पडिकल आणि जॉस बटलरनं पहिल्या चार षटकात आक्रमक फलंदाजी केली. 

- राजस्थानकडून पाचव्या क्रमांकवर खेळण्यासाठी आलेल्या शिमरॉन हेटमायरचा कॅच सुटली अन् सामना फिरला. हेटमायर 15 धावांवर असताना क्रुणाल पांड्यानं त्याची कॅच सोडली. त्यानंतर हेटमायरनं तडाखेबाज फलंदाजी करत राजस्थानचा स्कोर 165 वर पोहचवला. 

- या सामन्यादरम्यान राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू आर. अश्विन रिटायर्ड आऊट झाला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की, कोणता खेळाडू रिटायर्ड आऊट होऊन माघारी परतला.

- राजस्थाननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाची सुरुवात खराब झाली. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं पहिल्याच षटकात चेंडू ट्रेन्ट बोल्टच्या हातात देऊन लखनौच्या संघाला दोन मोठे झटके दिले. ट्रेन्ट बोल्टनं पहिल्याच षटकात लखौनचा कर्णधार केएल राहुल आणि कृष्णप्पा गौथमला माघारी धाडलं. 

- लखनौनं दोन विकेट्स गमावल्यानंतर राजस्थानच्या संघावर दबाव टाकण्यासाठी जेसन होल्डरला मैदानात पाठवण्यात आलं होतं. मात्र, संघाचा डाव पुढे घेऊन जाण्यास तो अपयशी ठरला. आर अश्विनच्या गोलंदाजीवर त्यानं आपली विकेट्स गमावली. 

- सामना राजस्थानच्या बाजूनं झुकलेला असताना क्विंटन डी कॉकनं संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. परंतु, त्यालाही लखनौच्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. तो चहलच्या गोलंदाजीवर आऊट झाला.  या सामन्यात त्यानं 31 चेंडूत 39 धावा केल्या आहेत. त्याच्या आऊट झाल्यानं पुन्हा राजस्थानच्या संघानं सामन्यावर कब्जा केला. 

- दरम्यान, आठराव्या षटकात संजू सॅमसननं युजवेंद्र चहलकडं चेंडू सोपावला. ही षटक दोन्ही संघासाठी महत्वाची होती. या षटकात युजवेंद्र चहलनं 15 धावा दिल्या. ज्यामुळं लखनौला जिंकण्यासाठी 12 चेंडूत 34 धावा शिल्लक राहिल्या. 

- लखनौच्या संघाला अखेरच्या षटकात लखनौच्या संघाला पंधरा धावांची गरज असताना राजस्थानचा युवा गोलंदाज कुलदीप सैननं भेदक गोलंदाजी केली. त्याच्यासमोर मार्कस स्टॉयनिसचं मोठं आव्हान होतं. परंतु, त्यानं पहिल्या चेंडूवर एक धाव देऊन त्यानंतचे तीन चेंडू निर्धाव टाकत सामना राजस्थानच्या बाजूनं झुकवला. 

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget