(Source: ECI/ABP News/ABP Majha)
16 वर्षानंतर आरसीबीनं चषक उंचावला, विराट कोहलीकडून कौतुक, चाहत्यांचा रस्त्यावर जल्लोष
IPL 2024 : तब्बल 16 वर्षानंतर आरसीबीला चषक उंचावता आला आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील महिला संघाने आज दिल्लीचा पराभव करत चषकावर नाव कोरले.
RCB Won IPL 2024 Title : तब्बल 16 वर्षानंतर आरसीबीला चषक उंचावता आला आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील महिला संघाने आज दिल्लीचा पराभव करत चषकावर नाव कोरले. मागील 16 वर्षांच्या इतिहासात आरसीबीला चषक उंचावता आला नव्हता. विराट कोहली कर्णधार असताना आरसीबीला चषक उंचावता आला नव्हता. पण आता स्मृती मंधानानं आरसीबीचा चषकाचा दुष्काळ संपवला आहे. आरसीबीच्या विजयानंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. सोशल मीडियावर आरसीबीच्या विजयाचा जल्लोष केला जातोय. रस्त्यावर चाहत्यांनी उतरुन आपला आनंद व्यक्त केला.
चाहत्यांचा जल्लोष -
महिला प्रिमियर लीग स्पर्धेत आरसीबीने दिल्लीचा पराभव करत चषकावर नाव कोरलेय. आरसीबीसाठी विराट कोहलीला जे जमलं नाही, ते स्मृती मंधानाने करुन दाखवलं आहे. 16 वर्षानंतर आरसीबीनं चषकावर नाव कोरलेय. फायनलमध्ये आरसीबीने दिल्लीचा आठ विकेटनं पराभव केला. त्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांच्या आनंदाला पारवार नव्हता. व्हॉट्सअॅप स्टेट्सवर आरसीबीचं कौतुक केलेय जातेय. इन्स्टा असो अथवा फेसबुक सगळीकडे चाहत्यांकडून आपसीबीच्या पोरीवंर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. आता फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील पुरुष संघही यंदा चषक उंचावणार, असं भाकित काही चाहत्यांकडून केले जातेय. एकूणच काय तर आरसीबीच्या चाहत्यांकडून आनंदोत्सोव साजरा करण्यात येतोय.
BENGALURU HAVE STARTED THE CELEBRATIONS.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 17, 2024
- The greatest night for RCB fans!pic.twitter.com/dTJUVsc9Ga
विराट कोहलीकडून आरसीबीच्या पोरींचं कौतुक -
महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्लीने आरसीबीसमोर 114 धावांचे आव्हान ठेवलं होतं. स्मृती मंधानाच्या आरसीबीने हे आव्हान आठ विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. आरसीबीसाठी स्मृती मंधाना हिने 31, सोफी डिवाइनने 32 आणि एलिस पेरी हिने नाबाद 35 धावांची खेळी केली. आरसीबीने चषक उंचावल्यानंतर स्मृती मंधाना आणि संघाने मैदानावरच जल्लोष केला. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली यानं आरसीबीच्या पोरींचं तोंडभरुन कौतुक केले. विराट कोहलीने व्हिडीओ कॉल करत आरसीबीच्या संघाचं अभिनंदन केले.
VIRAT KOHLI ON VIDEO CALL...!!!
— Johns. (@CricCrazyJohns) March 17, 2024
- Congratulating all the RCB Players. pic.twitter.com/vbJ0JCVi6Z
आरसीबीसाठी शानदार कामगिरी कुणी केली ?
दिल्लीने आरसीबीसमोर 114 धावांचे आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान आठ विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. स्मृती मंधाना हिने 31, सोफी डिवाइनने 32 आणि एलिस पेरी हिने नाबाद 35 धावांची खेळी केली. आरसीबीसाठी श्रेयंका पाटील हिने 4 विकेट घेतल्या. तर सोफी मोलिनक्स हिने 3 फलंदाजांना तंबूत पाठवलं. सोफी मोलिनक्स हिने एकाच षटकात दिल्लीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्यानंतरच दिल्लीची फलंदाजी ढेपाळली.
A HISTORIC PICTURE IN RCB's LEGACY ⭐ pic.twitter.com/A04WFwLcdp
— Johns. (@CricCrazyJohns) March 17, 2024
Going down in the history books 📙🏆
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 17, 2024
pic.twitter.com/OrQkgRailK
Loyalty is Royalty.
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 17, 2024
Thank you, 12th Man Army. ❤️🔥 pic.twitter.com/XGpiepMtfF
Streak broken 1 for RCB
— Dr.Shaun🇵🇸 (@fiftysix56__) March 17, 2024
Congratulations RCB RCB
pic.twitter.com/MtBTIf3K3H
they deserves millions of likes today no RCB fans will pass without liking this post....
— ࣪ (@getvibesheres) March 17, 2024
Congratulations RCB, RCB RCB 😭❤️#RCBvsDC || #WPLFinal #DCvRCB | #RCBvDC | #DCvsRCB pic.twitter.com/EMOfXWt2g4
Congratulations RCB RCB RCB!!🎊 Women!🏆🔥♥️ pic.twitter.com/WAfzXUUYAi
— sumit (@sumit45678901) March 17, 2024
RCB lifted the trophy in front of the Virat Kohli Pavilion with RCB RCB chants
— ICT Fan (@Delphy06) March 17, 2024
Power of "Ee Sala Cup Namde" ❤️ pic.twitter.com/KnKOZtbolA