IPl 2024 Romario Shepherd : 4,6,6,6,4,6 शेफर्डच्या वादळात नॉर्खियाचा पालापाचोळा, पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचे पैसे फिटले
IPL 2024 : मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्ससमोर 234 धावांचा डोंगर उभा केला. मुंबईकडून पहिलीच मॅच खेळणाऱ्या रोमॅरियो शेफर्डनं 10 बॉलमध्ये 39 धावा केल्या आहेत.
मुंबई : मुंबई इंडियन्सनं(Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध 5 विकेटवर 234 धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी आता 235 धावांची गरज आहे. मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना रोहित शर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्डच्या (Romario Shepherd) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर 234 धावा केल्या. मुंबईच्या टीमनं दिल्लीचा बॉलर नॉर्खियाची चांगलीच धुलाई केली. शेफर्डनं नॉर्खियाला अखेरच्या ओव्हरमध्ये 32 धावा काढल्या. यामध्ये चार षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे. नॉर्खियानं सूर्यकुमार यादवला शुन्यावर बाद केलं होतं.
रोमारियो शेफर्डच्या 10 बॉलमध्ये 39 धावा
दिल्ली कॅपिटल्सनं नॉर्खियाला अखेरची ओव्हर टाकण्याची संधी दिली होती. मात्र, नॉर्खियाची बॉलिगं रोमारियो शेफर्डनं फोडून काढली. रोमारियो शेफर्डनं आज मुंबई इंडियन्सकडून पहिलीच मॅच खेळली. यामध्ये त्यानं दिल्लीच्या बॉलिंगला फोडून काढलं. शेफर्डनं 10 बॉलमध्ये 39 धावा केल्या. रोमारियो शेफर्डनं 4 सिक्स आणि 3 चौकारांच्या जोरावर 39 धावा केल्या. रोमारियो शेफर्डनं बॉलिंग करताना डेव्हिड वॉर्नरला देखील बाद केलं.
कोण आहे रोमारियो शेफर्ड?
रोमारियो शेफर्ड हा वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्यानं यापूर्वी चार मॅच खेळल्या आहेत. शेफर्ड यापूर्वी लखनौ सुपर जाएंटसकडून खेळत होता. लखनौ सुपर जाएंटसनं त्याला 50 लाखांमध्ये संघात घेतलं होतं. मात्र, यंदाच्या आयपीएलपीएलपूर्वी शेफर्ड मुंबईच्या टीममध्ये आला. दिल्ली विरुद्धच्या मॅचपूर्वी शेफर्डच्या नावावर आयपीएलमध्ये केवळ 58 धावा होत्या. त्याच्या सर्वाधिक धावा 26 होत्या.
शेफर्ड हा टी-20 क्रिकेटमध्ये महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. शेफर्ड टी-20 क्रिकेटमध्ये 150 च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी करतो. शेफर्डनं वेस्ट इंडिजसाठी 31 मॅचमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामध्ये त्यानं 153.57 च्या स्ट्राइक रेटनं 301 धावा केल्या आहेत.
𝗕𝗹𝗼𝗰𝗸𝗯𝘂𝘀𝘁𝗲𝗿 𝗙𝗶𝗻𝗶𝘀𝗵 🔥
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2024
On Display: The Romario Shepherd show at the Wankhede 💪
Watch the match LIVE on @JioCinema and @starsportsindia 💻📱#TATAIPL | #MIvDC pic.twitter.com/H63bfwm51J
एकही अर्धशतक न करता 234 धावांचा डोंगर
मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी केली. रोहित शर्मानं 49, इशान किशननं 42 धावा केल्या. यानंतर हार्दिक पांड्यानं 39, टीम डेव्हिडनं 45 आणि रोमारियो शेफर्डनं 39 धावा केल्या. या सर्वांच्या धावंच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं 20 ओव्हरमध्ये 234 धावा केल्या.
मुंबई इंडियन्स विजयाचं खातं उघडणार?
मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी 20 ओव्हर्समध्ये 234 धावा केल्या आहेत. आता मुंबईचे गोलंदाज दिल्लीला रोखू शकणार का हे पाहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या :