Romario Shepherd Fifty : 6, 6, 4, 6, 6, 4... रोमारियो शेफर्डचा धुमाकूळ, 6 चेंडूत ठोकल्या 33 धावा; मग किती चेंडूत ठोकली फिफ्टी? वैभव सूर्यवंशीला टाकले मागे
या आयपीएल लीगमध्ये रोमारियो शेफर्डने कॅरेबियन ताकद दाखवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या शेफर्डने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात फक्त इतक्या चेंडूत अर्धशतक झळकावले.

Romario Shepherd 2nd Fastest Fifty in IPL history : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ज्याला आयपीएल 2025 च्या पहिल्या सात सामन्यांमधून बाहेर ठेवले. त्यानंतर पुढील 3 सामन्यांमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने फक्त 2 षटकांत सामनाच फिरवला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामन्यातही असेच काहीसे घडले. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली आणि जेकब बेथेल यांनी बंगळुरूला चांगली सुरुवात करून दिली, पण चिन्नास्वामीवर शो रोमारियो शेफर्डचा पाहिला मिळाला, ज्याने बंगळुरूच्या इतिहासातील आणि या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक फक्त 14 चेंडूत ठोकले.
Are you not entertained? 🤩
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2025
Romario Shepherd thrilled the M. Chinnaswamy Stadium with a 'blink and you miss' knock 🫡🔥
Updates ▶ https://t.co/I4Eij3ZNlN#TATAIPL | #RCBvCSK | @RCBTweets pic.twitter.com/uPDjTUpOvY
चिन्नास्वामीवर रोमारियो शेफर्डचा कॅरेबियन शो!
या आयपीएल लीगमध्ये रोमारियो शेफर्डने कॅरेबियन ताकद दाखवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या शेफर्डने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात फक्त 14 चेंडूत अर्धशतक झळकावले, जे या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक आहे. त्याने खलील अहमदच्या एका षटकात 33 धावा ठोकल्या. ज्यामध्ये सलग दोन षटकार, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक षटकार, ज्यामध्ये नो बॉलवर षटकार आणि त्यानंतर एका डॉट बॉलनंतर आणखी चार धावा होत्या. आयपीएलच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे.
𝙍𝙤𝙢𝙖𝙧𝙞𝙤 𝙍𝙖𝙢𝙥𝙖𝙜𝙚 🔥
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2025
Most runs in a single over this season, courtesy of the power-packed Romario Shepherd 😮💪
Watch the video here: https://t.co/GvsbUiBPdx#TATAIPL | #RCBvCSK | @RCBTweets pic.twitter.com/MGCcIpRlIi
वैभव सूर्यवंशीला टाकले मागे! या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक
अष्टपैलू रोमारियो शेफर्डने आपल्या अर्धशतकी खेळीत 6 षटकार आणि 4 चौकार मारले. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 378.57 होता. यशस्वी जैस्वालचा विक्रम मोडण्यात तो हुकला. 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध जैस्वालने फक्त 13 चेंडूत अर्धशतक ठोकले होते, जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक आहे. पण रोमारियो शेफर्डने वैभव सूर्यवंशीला मागे टाकले आहे. राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध 17 चेंडूत अर्धशतक झळकावलेले होते, पण या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक आता रोमारियो शेफर्डच्या नावावर आहे, ज्याने 14 चेंडूत ठोकले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 5 विकेट गमावून 213 धावा केल्या. आरसीबीकडून विराट कोहलीने 33 चेंडूत 62 धावा, जेकब बेथेलने 33 चेंडूत 55 धावा आणि रोमारियो शेफर्डने फक्त 14 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्ज आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.





















