(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'आमचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाहीय...'; मॅक्सवेलने माघार घेतली, त्यामगचं कारणही सांगितलं!
Glenn Maxwell RCB vs SRH: ग्लेन मॅक्सवेलच्या या खराब कामगिरीनंतर तो सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या होत्या.
Glenn Maxwell RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल 2024 च्या हंगामात 6 सामन्यात फक्त 32 धावा केल्या. तसेच तीन सामन्यात तो शून्यावर बाद झाला. मॅक्सवेलच्या या खराब कामगिरीनंतर तो सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या होत्या. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकल्याने ग्लेन मॅक्सवेलने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणास्तव त्याने आयपीएल स्पर्धेच्या मध्यभागी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.
'मी सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला कारण...'
ग्लेन मॅक्सवेलने सांगितले की, सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यातून आपण स्वत: संघासाठी योगदान देऊ शकत नसल्यामुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही सामने वैयक्तिकरित्या माझ्या अपेक्षेप्रमाणे नव्हते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे, हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे होते. शेवटच्या सामन्यानंतर मी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि प्रशिक्षकांशी बोललो. त्यानंतर अन्य खेळाडूला संधी द्यायची असे ठरले. मी याआधीही अशा परिस्थितीत होतो. सध्या मी स्वत:ला मानसिक आणि शारीरिक आराम देण्याचे काम करत आहे, असं मॅक्सवेलने स्पष्ट केले.
Maxwell said "I went to Faf & coaches after the last game - said I felt it was probably time we tried someone else - I felt like I wasn't contributing with the bat & the position in the table - It was a good time to give someone else an opportunity & make the spot their own". pic.twitter.com/OPvabtOTt9
— Johns. (@CricCrazyJohns) April 16, 2024
'आमचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाहीय...'
ग्लेन मॅक्सवेल पुढे म्हणतो की, संघाची कामगिरी पाहता हा निर्णय घेणे फारसे अवघड नव्हते. आमचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाही, हे आकडे स्पष्टपणे दाखवतात. याशिवाय वैयक्तिकरित्या मी सतत फ्लॉप होत होतो. त्यामुळे मला असे वाटले की, मी सकारात्मक योगदान देऊ शकलो नाही, दुसऱ्या खेळाडूला संधी देणे योग्य ठरेल. मात्र, मी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
आरसबीचा हैदराबादविरुद्ध 25 धावांनी पराभव-
तब्बल 549 धावा कुटल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 25 धावांनी नमवले. हैदराबादनं दिलेल्या 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीनं 262 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून दिनेश कार्तिक आणि फाफ डु प्लेसिस यांनी लढा दिला, पण विजय मिळून देऊ शकले नाहीत. हैदराबादकडून पॅट कमिन्स यानं भेदक मारा केला. कमिन्सनं आरसीबीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. आरसीबीला सात सामन्यात सहा पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादनं चौथ्या विजयाची नोंद केली. हैदराबादचा संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानावर विराजमान आहे.
संबंधित बातम्या:
काव्या मारन त्या क्षणी लगेच उठली अन् नाचली; फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या
दिनेश कार्तिकने लगावला यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत लांब षटकार; चेंडू थेट बाहेर, एकदा Video बघाच!
RCB vs SRH: 549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद