एक्स्प्लोर

IPL 2023 : आरसीबीचा हल्लाबोल! बंगलोरचा राजस्थानवर रॉयल विजय

RCB vs RR, IPL 2023 : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानवर रॉयल विजय मिळवला.

RCB vs RR, IPL 2023 : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानवर रॉयल विजय मिळवला. दोन रॉयलमध्ये झालेल्या लढतीत आरसीबीने बाजी मारली. आरसीबीने  राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने निर्धारित २० षटकात १८९ धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल, फाफ डु प्लेसिस आणि हर्षल पटेल आरसीबीच्या विजयाचे सुत्रधार राहिले. मॅक्सवेल आणि फाफ यांनी वादळी अर्धशतके झळकावली. त्यानंतर गोलंदाजीत हर्षल पटेलने तीन विकेट घेतल्या. 

आरसीबीने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवा खराब झाली. पहिल्याच षटकात सिराजने जोस बटलरला तंबूत धाडले. जोस बटलरचा खातेही उघडता आले नाही. पण त्यानंतर युवा यशस्वी जायस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी सामन्यचे चित्र बदलले. दोघांनी दमदार फलंदाजी केली. दुसऱ्या विकेटसाठी या युवा फलंदाजांमध्ये ९८ धावांची भागिदारी झाली. देवदत्त पडिक्कल याने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. पडिक्कलने ३४ चेंडूत एक षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने ५२ धावांचे योगदान दिले. पडिक्कल बाद झाल्यानंतर यशस्वी जायस्वालही बाद झाला. जायस्वाल याने ३७ चेंडूत दोन षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली. जायस्वाल बाद झाल्यानंतर सामव्याचे चित्र बदलले. आरसीबीने सामन्यावर पकड मिळवण्यास सुरुवात केली.  संजू सॅमसन २२धावा काढून बाद झाला... शिमरोन हेटमायर तीन धावांवर धावबाद झाला. सुयेशप्रभुदेसाई याने जबरदस्त थ्रो करत हेटमायरला धाबाद केले. ध्रुव जुरेल याने अखेरपर्यंत लढा दिला. जुरेल याने १६ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. अश्विन याने १२ धावांचे योगदान दिले. 

आरसीबीकडून हर्षल पटेल याने भेदक मारा केला. पटेलने चार षटकात ३२ धावांच्या मोबद्लयात तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय मोहम्मद सिराज आणि डेविड विली यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

आरसीबीचे १९० धावांचे आव्हान, मॅक्सवेल-फाफची अर्धशतके

ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने २० षटकात नऊ विकेटच्या मोबदल्यात १८९ धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल याने ७७ तर फाफ डु प्लेलिस याने ६२ धावांची खेळी केली. आरसीबीला अखेरच्या पाच षटकात धावा जमवण्यात अपयश आले. आरसीबीने अखेरच्या पाच षटकात फक्त ३३ धावा जमवल्या. यादरम्यान आरसीबीने पाच विकेट गमावल्या. हाणामारीच्या षटकात चहल याने भेदक मारा केला. आरसीबीचे तीन फलंदाज धावबाद झाले.  

ग्लेन मॅक्सवेलचा बिग शो -

अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने वादळी फलंदाजी केली. मॅक्सवेल याने पहिल्या चेंडूपासूनच राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मॅक्सवेल याने ४४ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. या खेळीत मॅक्सवेल याने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. अश्विन याने मॅक्सवेल याची खेळी संपुष्टात आणली. विराट कोहली आणि शाहबाद लागोपाठ तंबूत परतल्यानंतर मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी आरसीबीचा डाव सावरला. मॅक्सवेलने फाफसोबत तिसऱ्या विकेटला ६६ चेंडूत १२७ धावांची भागिदारी केली.  यामध्ये मॅक्सवेलचे योगदान ६५ धावांचे होते. 

फाफचे वादळी अर्धशतक -

पहिल्या चेंडूवर विराट कोहली बाद झाल्यानंतर फाफ डु प्लेलिस याने संयमी आणि आक्रमक फलंदाजी केली. विराट कोहली आणि शाहबाज अहमद यांनी लागोपाठ विकेट फेकल्या. त्यानंतर फाफने मॅक्सवेलसह आरसीबीचा डाव सांभाळला. सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेतला. फाफ डु प्लेसिस याने ३९ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीत फाफने दोन षटकार आणि आठ चौकार लगावले. फाफ डु प्लेसिस याने मॅक्सवेलसोबत ६६ चेंडूत १२७ धावांची भागिदारी केली. यामध्ये फाफ डु प्लेसिस याने ५२ धावांचे योगदान दिले.

विराट कोहली गोल्डन डक - 
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने बंगलोरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्ट याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत संजूचा निर्णय सार्थ ठरवला. पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्ट याने भन्नाट फॉर्मात असलेल्या विराट कोहलीला एलबीड्ब्ल्यू बाद केले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली बाद होऊ तंबूत परतला. राजस्थानच्या ट्रेंट बोल्ट याने डावाच्या पहिल्याच चेंडू इनस्विंग टाकला... तो चेंडू विराट कोहलीच्या पॅडवर लागला. पंचांनी विराट कोहलीला LBW बाद दिले... विराट कोहलीला काही सेकंद खेळपट्टीवरच होता.. त्याने डीआरएसही घेतला नाही. विराट कोहलीने फाफकडे पाहिले अन् मैदान सोडले.  आयपीएलच्या करिअरमध्ये विराट कोहली दहाव्यांदा शून्यावर बाद झालाय.  2022 आणि 2014 मध्ये विराट कोहली तीन तीन वेळा शून्यावर बाद झालाय.  

इतर फलंदाजांची कामगिरी कशी ?

ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव घसरला.  शाहबाज अहमद २, महिपाल लोमरोर ८, दिनेश कार्तिक १६, सुयेश प्रभुदेसाई ०, हसरंगा सहा, विजयकुमार वैशाक शून्य धावांचे योगदान दिले. डेविड विली याने दोन चेंडूत चार धावांची खेळी केली.

राजस्थानची गोलंदाजी कशी - 
बोल्टने पहिल्या चेंडूवर विराटला बाद केले. पण बोल्ट महागडा राहिला. बोल्टने चार षटकात ४१ धावा खर्च केल्या. बोल्टने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय संदप शर्माही आज महागडा ठरला. संदीपला चार षटकात ४९ धावा निघाल्या. संदीपने दोन विकेट घेतल्या. युजवेंद्र चहल आणि अश्विन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget