RCB vs GT : विराट कोहलीसमोर मोहम्मद शामीचं आव्हान, कोण पडणार भारी? काय सांगतात आकडे
IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर सामना रंगणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्सने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केलेय.
Virat Kohli Mohammed Shami Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर सामना रंगणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्सने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केलेय. पण फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीला प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचाच आहे. गुणतालिकेत गुजरात अव्वल तर आरसीबीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. टॉप 4 मध्ये पोहचण्यासाठी आणि प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी आरसीबीला विजय अनिवार्य आहे. या सामन्यात विराट कोहली आणि मोहम्मद शामी यांच्यातील सामना पाहण्यासारखा होणार आहे.
फाफच्या नेतृत्वातील आरसीबीने यंदाच्या हंगामात सरासरी कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात दणक्यात सुरुवात करणाऱ्या आरसीबीला अखेरच्या काही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आरसीबीला गुजरातविरोधात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल, जेणेकरुन नेटरनरेटही चांगला होईल. आज होणाऱ्या सामन्यात मोहम्मद शामी आणि विराट कोहली यांचा सामना पाहण्यासारखा असेल. मोहम्मद शामीच्या 60 चेंडूचा विराट कोहलीने सामना केलाय. यामध्ये पाच वेळा विराट कोहली बाद झाला... तर त्याने या 60 चेंडूवर 80 धावा काढल्या आहेत.
विराट कोहलीची कामगिरी -
यंदाच्या हंगामात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 13 सामन्यात कोहलीला फक्त 236 धावा काढता आल्यात. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.
शामीची कामगिरी -
यंदाच्या हंगामात शामीने भेदक मारा केलाय. शामीने 13 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. पावरप्लेमध्ये शामीने गुजरातसाठी जवळपास प्रत्येकवेळा विकेट घेण्याचा करिश्मा केलाय. 25 धावा देऊन तीन विकेट घेत शामीने यंदा सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
चौथ्या स्थानासाठी दिल्ली, बंगळुरुत चुरस -
दिल्ली आणि बंगळुरु या दोन्ही संघानी आतापर्यंत 7-7 सामने जिंकले आहेत. प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी त्यामुळेच हे दोन्ही संघ आघाडीवर आहेत.या दोघांपैकी एकही संघ शेवटचा सामना जिंकल्यास हैदराबाद आणि पंजाब यांचे पुढील फेरीचे चान्सेस संपूर्णपणे संपतील. दिल्ली आणि बंगळुरु हे दोन्ही संघ शेवटचा सामना पराभूत झाल्यास इतर संघाना संधी मिळू शकते.
हे देखील वाचा-