RCB vs GT, IPL 2023 Live: आरसीबी आणि गुजरातमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
RCB vs GT Live Score: गुजरात संघाने आधील प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर आरसीबी शेवटच्या जागेसाठी प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे.
LIVE
Background
IPL 2023, Match 70, RCB vs GT: आज आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामातील (IPL 2023) शेवटचा साखळी सामना आरसीबी (Royal Challengers Bangalore) आणि गतविजेत्या गुजरात (Gujrat Titans) या दोन संघात पाहायला मिळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) रविवारी, 21 मे रोजी त्यांचा शेवटच्या लीग सामन्यासाठी घरच्या मैदानावर परतला आहे. आरसीबी संग होमग्राऊंड एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज गुजरात टायटन्सविरोधात खेळणार आहे. गुजरात संघाने आधील प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर आरसीबी शेवटच्या जागेसाठी प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे.
आरसीबीला गतविजेत्या गुजरात संघाचं आव्हान
गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोण्याची संधी आहे. त्यांनी आजचा सामना जिंकल्यास बंगळुरुला प्लेऑफ तिकीट मिळू शकतं. शिवाय आजच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्यास आरसीबी नेट रनरेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो. कारण, मुंबई संघाचा नेट रनरेट बंगळुरुपेक्षा कमी आहे.
RCB vs GT Head to Head : मुंबई विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये गुजरात (GT) आणि बंगळुरु (RCB) या संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. यंदाच्या मोसमात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. गुजरात टायटन्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.
पावसाचे सावट -
आरसीबी अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. आरसीबी संघाचा प्लेऑफ तिकीट आजच्या सामन्यात त्यांच्या विजयावर अवलंबून आहे. बंगळुरु आजच्या सामन्यात पराभूत झाल्यास संघ प्लेऑफमध्ये जाण्याची संधी गमावू शकतो. आजच्या सामन्याआधी बंगळुरु संघासमोर अडचणी वाढताना दिसत आहे. यामुळे आरसीबी संघ आणि त्याच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. बंगळुरूमध्ये शनिवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यासोबतच रविवारीही बंगळुरुमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बंगळुरु संघासाठी प्लेऑफचं समीकरण काय?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी प्लेऑफच्या समीकरण जाणून घ्या. सध्या 13 सामन्यांतून सात विजयांसह आरसीबी संघाकडे 14 गुण आहेत. जर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर संघाला त्यांचा गुजरात विरोधातील शेवटचा साखळी सामना जिंकून 16 गुण मिळवावे लागतील. शिवाय, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव व्हावा किंवा मुंबईला कमी फरकाने विजय मिळावा, अशी इच्छा बाळगावी लागेल. यामुळे स्थितीत आरसीबीला 16 गुण मिळतील आणि त्याचा नेट रन रेटही मुंबईपेक्षा चांगला असेल. असे झाल्यास आरसीबीला प्लेऑफचं तिकीट मिळेल. पण सध्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
GT vs RCB, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात 21 मे रोजी रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
गुजरातचा विजय
गुजरातचा विजय
गुजरातला चौथा धक्का
गुजरातला चौथा धक्का.. मिलर सहा धावांवर बाद
गुजरातला लागोपाठ दोन धक्के
गुजरातला लागोपाठ दोन धक्के.... विजय शंकरनंतर दासुन शनाका बाद झालाय... शुभमन गिलची एकाकी झुंज सुरुच
विजय शंकरचे तांडव
शुभमन गिल याच्यानंतर विजय शंकर यानेही अर्धशतक झळकावले. विजय शंकर याने 34 चेंडूत अर्धशतक झळकावले.
गिलचे वादळ...
बेंगलोरच्या मैदानावर शुभमन गिल याने वादळी फलंदाजी केली. गिल सध्या 28 चेंडूत 69 धावांवर खेळत आहे.