RCB vs GT : आरसीबीसाठी 'करो या मरो', आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचाच, पाहा संपूर्ण गणित
RCB, IPL Playoffs 2022 : प्लेऑफच्या दोन जागांसाठी पाच संघामध्ये लढत होत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत राजस्थान आणि दिल्ली संघ आघाडीवर आहेत.
RCB, IPL Playoffs 2022 : आयपीएलचा 15 वा हंगाम जसा समारोपाकडे झुकला तसा अधिक रोमांचक झालाय. 66 सामन्यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात आणि केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ हे दोन्ही संघ फक्त प्लेऑफमध्ये पोहचले आहेत. कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या तीन संघाचे आव्हान संपुष्टात आलेय. प्लेऑफच्या दोन जागांसाठी पाच संघामध्ये लढत होत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत राजस्थान आणि दिल्ली संघ आघाडीवर आहेत. आरसीबीला प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी फक्त विजय आणि विजय गरजेचा आहे.
पंजाब किंग्सकडून पराभव पत्कारावा लागल्यानंतर फाफ डयुप्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीचे आव्हान अधिक खडतर झालेय. अशात आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आज विजय अनिवार्य आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला आजचा विजय करो या मरो असाच आहे. पराभव झाल्यास आरसीबीचं प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात येईल.
गुजरातविरोधात सामना जिंकल्यास प्लेऑफमधील आव्हान कायम -
आयपीएलच्या 15 व्या हंगामात आरसीबीने 13 सामन्यात सात विजय मिळवले आहेत. आरसीबीचा अखेरचा सामना तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या गुजरातबरोबर आहे. अखेरचा साखळी सामना जिंकून प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्याच्या इराद्याने आरसीबी मैदानात उतरले. इतकेच नव्हे तर दिल्लीचा मुंबईकडून पराभव व्हावा, तेव्हाच आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. जर अखेरच्या सामन्यात दिल्लीचा विजय झाल्यास आरसीबीचे आव्हान संपुष्टात येईल.. दिल्लीचा नेटरनरेट आरसीबीपेक्षा चांगलाय.
अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली जिंकल्यास ?
ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीचा संघ अखेरच्या लीग सामन्यात जिंकल्यास आरसीबीचे प्लेऑफमधील आव्हान खडतर होईल.. मुंबईविरोधात दिल्ली कमी फरकाने जिंकल्यास आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचता येईल. तसेच आरसीबीला गुजरातविरोधात मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागणार आहे, जेणेकरुन दिल्लीपेक्षा जास्त नेटरनरेट होईल.
आरसीबीचा नेटरनरेट दिल्लीपेक्षा चांगला नाही झाला तर?
दिल्ली आणि आरसीबी यांचा अखेरच्या लीग सामन्यात विजय झाल्यास अन् आरसीबीचा नेट रनरेट दिल्लीपेक्षा चांगला नसेल तर ... राजस्थान अखेरचा लीग सामना मोठ्या फरकाने गमावावा लागेल... तरच आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे.
गुजरातविरोधात आरसीबीचा पराभव झाल्यास?
अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीचा पराभव झाल्यासही आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. पण आव्हान खूपच खडतर आहे. कारण दिल्लीला अखेरच्या लीग सामन्यात मोठ्या फरकाने पराभव व्हावा लागले. जेणेकरुन दिल्लीचा नेटरनरेट कमी होईल. तसेच अखेरचा लीग सामन्यात पंजाबचा पराभव व्हावा.. अन् हैदराबाद कमी अंतराने जिंकावे.