RCB vs GT Probable 11 : आज रंगणार बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना, कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
IPL 2022 : रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स (RCB Vs GT) यांच्यात आज आयपीएल 2022 मधील 67 वा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळला जाणार आहे.
IPL 2022, RCB vs GT: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या यंदाच्या हंगामात नव्याने सामिल झालेल्या गुजरातने अगदी दमदार कामगिरी करत सर्वात आधी प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा सामना केवळ एका प्रॅक्टिस मॅचप्रमाणे असेल. पण त्यांच्या समोर असणाऱ्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघासाठी मात्र आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या सामन्यात एक मोठा विजयच त्यांच स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवू शकणार आहे.गुजरातला विजयी मालिका सुरु ठेवायची असून बंगळुरुला (GT vs RCB) विजय अनिवार्य असल्याने आज या दोघांमध्ये एक चुरशीची लढत पाहायला मिळेल. आजचा 67 वा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळवला जाणार आहे.
गुणतालिकेचा विचार करता गुजरात टायटन्सने 13 पैकी 10 सामने जिंकत 20 गुण मिळवले आहेत. तर बंगळुरुच्या संघाने 13 पैकी 7 सामने जिंकल्याने त्यांच्या खात्यावर 14 गुणच आहेत. आता आज बंगळुरुची कामगिरी आणि त्यानंतर इतर संघाचे सामने आणि गुणतालिकेच्या गणितावर बंगळुरुचं पुढील फेरीत पोहचणं अवलंबून असणार आहे. आजचा सामना सायंकाळी असल्यानं दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे, पण मागील सामन्याचं पाहता आज नाणेफेक जिंकणारा नेमका कोणता निर्णय घेईल हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. दरम्यान या दोन्ही चॅम्पियन्समध्ये आजची लढत असल्याने कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते यावर एकदा नजर फिरवूया...
बंगळुरु विरुद्ध गुजरात संभाव्य संघ-
रॉयल चँलेजर्स बंगळुरु - रजत पाटीदार, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), माहिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज
गुजरात टायटन्स: शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, यश दयाल, अल्झारी जोसेफ,साई किशोर, मोहम्मद शमी.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : हैदराबादविरुद्धही मुंबई पराभूत, खराब प्रदर्शनानंतर कर्णधार रोहितनं सांगतिला 'फ्यूचर प्लॅन'
- MI vs SRH, IPL 2022: उमरान मलिकच्या वेगासमोर मुंबईचे फलंदाज ढेर, रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा 3 धावांनी विजय
- Shikhar Dhawan: शिखर धवनची थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री? 'या' दिवशी त्याचा पहिला चित्रपट होणार प्रदर्शित