IPL 2023 : आरसीबीच्या अडचणीत आणखी वाढ, मागील हंगामातील शतकवीर फलंदाज सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता
RCB: IPL 2023 पूर्वी RCB साठी आणखी एक वाईट बातमी समोर आली. रजत पाटीदार ज्याने मागील हंगामात एलिमिनेटर सामन्यात शतक झळकावलं होतं, तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना संघात नसण्याची शक्यता आहे.
IPL 2023, RCB : आयपीएल 2023 (IPL) सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फलंदाज रजत पाटीदार टाचेच्या दुखापतीमुळे या आयपीएल हंगामाच्या पूर्वार्धातून बाहेर असू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळणारा रजत पाटीदार सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरू येथे रिकव्हर होत आहे. पाटीदार हा आयपीएल 2022 मध्ये आरसीबीसाठी महत्त्वाचा फलंदाज होता. त्याने एलिमिनेटर सामन्यात आपल्या शतकासह संघाला विजय मिळवून दिला होता.
ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, पाटीदारला दुखापतीमुळे तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर एमआरआय स्कॅननंतर तो उर्वरित स्पर्धेत आपल्या संघाकडून खेळू शकेल की नाही याचा निर्णय घेतला जाईल. अहवालाचा विचार केला तर, पाटीदार आरसीबी कॅम्पमध्ये सामील होण्यापूर्वीच जखमी झाला होता. आता आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची परवानगी घ्यावी लागेल.
फलंदाजीत होणार बदल!
रजत पाटीदारच्या दुखापतीनंतर (Rajat Patidar Injury) आरसीबीच्या फलंदाजीत (RCB Batting Order) बदल पाहायला मिळतो. आरसीबीचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी यापूर्वी सांगितले होते की विराट कोहली कर्णधार फाफ डू प्लेसिससोबत सलामी देईल आणि रजत पाटीदार तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी सांभाळेल. अशा परिस्थितीत जर पाटीदार बाहेर पडला तर आरसीबीच्या लाइनअपमध्ये बदल निश्चित आहे.
लखनौविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात शतक ठोकले
आयपीएल 2022 मध्ये, रजत पाटीदारने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात आपल्या शानदार शतकाने संघाला विजय मिळवून दिला. तिसऱ्या क्रमांकावर येताना त्याने 54 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 112 धावा केल्या. आरसीबीने हा सामना 14 धावांनी जिंकला.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संभाव्य प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर/मायकेल ब्रेसवेल, हर्षल पटेल, वनिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज
IPL 2023 चे काही नवीन नियम
निर्धारित वेळेबाहेरील प्रत्येक षटकासाठी 30-यार्ड वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे.
यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या चूकीच्या हालचालींमुळे डेड बॉल आणि 5 पेनल्टी रन्स मिळतील.
नाणेफेक झाल्यानंतर संघांनी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करायची आहे.
फ्रँचायझी 15-खेळाडूंच्या टीम शीटचे नाव देतील, ज्यामध्ये 4 पर्यायांपैकी एक इम्पॅक्ट खेळाडू असेल.
हे देखील वाचा-