IPL 2024 RCB Rajat Patidar: आयपीएल 2024चा 62 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीला पराभूत करत बंगळुरुने या हंगामातील सहाव्या विजयाची नोंद केली आहे. खरंतर या सामन्यात विराट कोहलीला 30 धावाही करता आल्या नाहीत. मात्र रजत पाटीदारने (Rajat Patidar) शानदार फलंदाजी केली. या सामन्यात रजत पाटीदारने पाचवे अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीत एक शॉटचाही समावेश होता ज्याने महान गोलंदाज ब्रेट लीलाही प्रभावित केले.


ब्रेट ली पाटीदारच्या कोणत्या शॉटने प्रभावित झाला होता?


खरे तर पाचव्या षटकात रजत पाटीदारने मुकेश कुमारवर मारलेल्या कव्हर ड्राईव्हने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मॅचनंतर जिओ सिनेमाशी बोलताना ब्रेट ली म्हणाला की, जर कोणी हायलाइट्स पाहत असेल तर त्याला वाटले असेल की हा शॉट विराट कोहलीचा आहे. पाटीदारचा कव्हर ड्राईव्ह विराट कोहलीपेक्षा कमी नाही, असंही ब्रेट लीने सांगितले. 


ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट ली काय म्हणाला?


पाटीदारने या मोसमात आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले आहे. आम्हाला माहित आहे की तो कसोटी क्रिकेट देखील खेळला आहे, परंतु फॉर्ममध्ये येण्यासाठी त्याला थोडा वेळ लागला. पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याच्याकडे कव्हर ड्राइव्ह होता. त्याने आपला फॉर्म परत मिळवला आहे हे पाहून खूप आनंद झाला.


फिरकीपटूंविरुद्ध पाटीदारची कामगिरी


रजत पाटीदारसाठी आयपीएल 2024 ची सुरुवात संथ होती. ग्लेन मॅक्सवेलच्या खराब फॉर्ममुळे त्याला आरसीबीमध्ये संधी मिळाली. पण, मॅक्सवेलची जागा घेतल्यानंतर पाटीदारने चांगली कामगिरी केला. त्याने सहजतेने फिरकीपटूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आणि या हंगामात फिरकी गोलंदाजीविरुद्ध त्याने 20 हून अधिक षटकार मारले. दिल्लीविरुद्ध 52 धावा केल्यानंतर पाटीदारने आता 13 सामन्यात 179.78 च्या स्ट्राइक रेटने 320 धावा केल्या आहेत. ज्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.


कसा रंगला सामना? 


188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने 30 धावांत 4 विकेट गमावल्या. असे असतानाही पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 4 गडी गमावून संघाने 50 धावांचा टप्पा पार केला. अशा स्थितीत शाई होप आणि अक्षर पटेल यांच्यात 56 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. पण 10व्या षटकात लॉकी फर्ग्युसनने शाई होपला 29 धावांवर बाद केले. 11व्या षटकात केवळ 3 धावा काढून ट्रिस्टन स्टब्स बाद झाला. आता संघाकडे एकही फलंदाज उरला नव्हता. 15व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 10 धावा करून रसिक दार सलाम पॅव्हेलियनमध्ये परतला. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या 5 षटकात 61 धावा करायच्या होत्या. 16व्या षटकात यश दयालने अक्षर पटेलला 57 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले, त्यामुळे बेंगळुरूचा विजय जवळपास निश्चित झाला. दिल्लीने 18 षटकापर्यंत 135 धावा केल्या होत्या, पण फक्त एक विकेट शिल्लक होती. शेवटच्या षटकात 48 धावा करणे अशक्य होते. दिल्ली 140 धावांवर सर्वबाद झाली, त्यामुळे आरसीबीने हा सामना 47 धावांनी जिंकला.


संबंधित बातम्या:


चौकार, षटकार लगावत पहिले विराट कोहलीने डिवचले; बाद करताच इशांत शर्माची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video


Video: चेन्नईचा निरोप घेताना एमएस धोनीने सुरेश रैनाला मारली मिठी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पाहा Video


IPL 2024: 'तुम्हाला 400 कोटी रुपये मिळाले तर...', केएल राहुलसाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात, लखनौच्या मालकाला खडसावले!