IPL 2024, RCB vs DC, Virat Kohli Ishant Sharma बंगळुरु : आयपीएलमध्ये काल 62 व्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (Royal Chelleners Bengaluru) दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) 47 धावांनी पराभूत केलं. या विजयामुळं  बंगळुरुच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. आरसीबीचा प्रमुख खेळाडू विराट कोहली हा दिल्लीचा असून इशांत शर्मा देखील दिल्लीचा खेळाडू आहे. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमधील मॅचच्या निमित्तानं आने सामने आले. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ठरली.  


विराट कोहलीनं डावाच्या पहिल्या ओव्हरपासून इशांत शर्माची खेचण्यास सुरुवात केली होती. इशांत शर्मा दिल्लीकडून चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा फलंदाजीसाठी आला. यावेळी विराट कोहलीनं एक षटकार आणि चौकार मारला. यानंतर इशांत शर्मानं पुढच्या बॉलवर विराट कोहलीला बाद केलं. इशांत शर्मानं पहिल्यांदाच आयपीएलमध्ये विराट कोहलीची विकेट घेतली. विराट कोहली बाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये जात असताना इशांत शर्मानं त्याचा बदला घेतला. इशांत शर्मानं विराट कोहलीची मजा घेतली. 


इशांतकडून विराटला धक्के 







विराट कोहलीनं इशांत शर्मानं केलेल्या कृतीचा बदला घेतला. विजयासाठी 188 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची टीम 140 धावांवर बाद झाली. यावेळी इशांत शर्मा  फलंदाजीला आला त्यावेळी विराट कोहलीनं त्याचा बदला घेतला विराट कोहलीनं इशांत शर्माला धक्के दिले. याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. 


विराटनं कसा घेतला बदला? 







आरसीबीची पाचव्या स्थानी झेप


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात निराशाजनक झाली होती. चेन्नई सुपर किंग्जनं आरसीबीला पहिल्याच मॅचमध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर एका मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर सलग सहा मॅचमध्ये पराभव स्वीकारणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दमदार कमबॅक केलं आहे. आरसीबीनं सहा पराभवानंतर सलग पाच मॅचमध्ये विजय मिळवत गुणतालिकेत मोठी झेप घेतलीय. आरसीबी आता पाचव्या स्थानावर आहे.  


दिल्लीची घसरण:


रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्सनं देखील यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीच्या पराभवानंतर दमदार कमबॅक केलं होतं. एकीकडे मुंबई इंडियन्स सारखा संघ आयपीएलबाहेर गेला असताना रिषभ पंतची टीम अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. रिषभ पंत कालच्या मॅचमध्ये खेळत नसल्याचा फटका दिल्ली कॅपिटल्सला बसला. दिल्ली कॅपिटल्स आता गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. 


संबंधित बातम्या : 


IPL 2024 Virat Kohli And Ishant Sharma: चौकार, षटकार लगावत पहिले विराट कोहलीने डिवचले; बाद करताच इशांत शर्माची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video


RCB vs DC : आरसीबीनं दहा दिवसात गेम फिरवला, थेट पाचव्या स्थानावर झेप, बंगळुरुच्या विजयानंतर अनुष्का शर्माकडून अनोखं सेलिब्रेशन