Obstructing The Field In IPL चेन्नई : आयपीएल 2024 च्या 61 व्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल् यांच्यात मॅच पार पडली. ही मॅच चेन्नईनं 5 विकेटनं जिंकली. यामॅचमधील रवींद्र जडेजाची विकेट चर्चेचा विषय ठरली. जडेजाला 'ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड' च्या नियमानुसार बाद व्हावं लागलं. जडेजा आयपीएलच्या इतिहासात अशा प्रकारे बाद होणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. मात्र, रवींद्र जडेजाकडून असा प्रकार पहिल्यांदाच घडलाय असं नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅचमध्ये असाच प्रकार घडला होता. मात्र, त्यावेळी सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं दिलदारपणा दाखवत ते अपील मागं घेतलं होतं त्यामुळं रवींद्र जडेजाला बाद दिलं गेलं नव्हतं. 



'ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड' नियमानुसार रवींद्र जडेजा बाद होण्याची ही पहिली वेळ आहे. मात्र, सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये देखील असाच प्रकार घडला होता. पॅट कमिन्सनं त्यावेळी अपील मागं घेतलं होतं. तर, रवींद्र जडेजाकडून तशाच प्रकारची चूक झाल्यानंतर संजू सॅमसननं अपील केल्यानंतर जडेजाला  थर्ड अम्पायरनं बाद दिलं.  
 


पाहा व्हिडीओ :




'ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड' नियमानुसार बाद होणारा तिसरा खेळाडू


'ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड' नियमानुसार बाद होणारा रवींद्र जडेजा तिसरा खेळाडू ठरला आहे. चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील मॅच दरम्यान 15 व्या ओव्हरमध्ये दुसरी रन घेण्याच्या प्रयत्नात जडेजा बाद झाला. संजू सॅमसन यानं फेकलेला थ्रो रवींद्र जडेजाला लागला. यामुळं थर्ड अम्पायरनं जडेजला बाद दिलं.  


आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा यूसुफ पठाण पहिल्यांदा असा प्रकारे बाद झाला होता. 2013 च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइठ रायडर्स आणि पुणे वॉरिअर्स इंडिया यांच्यातील मॅचमध्ये यूसुफ पठाण अशा प्रकारे तो बाद झाला होता. त्यावेळी यूसुफ पठाण कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता.  


अमित मिश्रा देखील अशाच प्रकारे 2019 मध्ये बाद झाला होता. त्यावेळी तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. आयपीएल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅचमध्ये हा प्रकार घडला होता. आता अशा प्रकारे बाद  होणारा रवींद्र जडेजा तिसरा खेळाडू ठरलाय. 


संबंधित बातम्या : 


IPL 2024 Virat Kohli And Ishant Sharma: चौकार, षटकार लगावत पहिले विराट कोहलीने डिवचले; बाद करताच इशांत शर्माची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video


RCB vs DC : आरसीबीनं दहा दिवसात गेम फिरवला, थेट पाचव्या स्थानावर झेप, बंगळुरुच्या विजयानंतर अनुष्का शर्माकडून अनोखं सेलिब्रेशन