IPL 2024: लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यातील मॅचनंतर केएल राहुल (KL Rahul) आणि संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. लखनौ सुपर जाएंटसचे मालक संजीव गोयंका यांनी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या पराभवानंतर केएल राहुलला ऑन कॅमेरा जाब विचारला होता. यावरुन संजीव गोयंका यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) संजीव गोयंका यांचा खरपूस समाचार घेतला. 


400 कोटींचा नफा


क्रिकबझवर चर्चा करताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, "ते सगळे उद्योगपती आहेत आणि त्यांना फक्त नफा-तोट्याची भाषा कळते. पण इथे तोटा नाही, मग तुम्हाला काय अडचण आहे? ते 400 कोटींचा नफा कमावत आहेत आणि हा असा व्यवसाय आहे जिथे त्यांना काहीही करण्याची गरज नाही. तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल कारण परिणाम काहीही असो, त्यांना नफा मिळतो. मालकाचे काम असे असले पाहिजे की जेव्हा तो पत्रकार परिषदेत किंवा ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटतो तेव्हा त्याने त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं सेहवागने सांगितले. 


केएल राहुल लखनौ सोडणार का?


व्हायरल व्हिडिओमध्ये केएल राहुल संजीव गोयंका यांच्यासमोर उभं राहून सर्व काही ऐकत होता. अशा परिस्थितीत लोक असा अंदाज लावू लागले की केएल राहुल आयपीएल 2024 नंतर लखनौ सुपर जायंट्स सोडू शकतात. याशिवाय, लीग टप्प्यातील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये राहुल कदाचित LSG चे नेतृत्व करणार नसल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात राहुलने 33 चेंडूत 29 धावा केल्या होत्या.


धोनीलाही कर्णधारपदावरून हटवले होते-


आयपीएल 2016 पूर्वी एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सला दोनदा चॅम्पियन बनवले होते. पण 2016 चा हंगाम रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी खूपच खराब होता. साखळी टप्प्यात खेळल्या गेलेल्या 14 सामन्यांपैकी केवळ 5 वेळा आरपीएसने विजय मिळवला. गुणतालिकेत संघ सातव्या स्थानावर आहे. मोसमातील खराब कामगिरीमुळे संजीव गोयंका आणि व्यवस्थापनातील इतर सदस्यांनी मिळून धोनीला कर्णधारपदावरून हटवले होते.


संबंधित बातम्या:


MS Dhoni: MS धोनी आज निवृत्तीची घोषणा करणार?; चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटची रंगली चर्चा, चाहते भावूक


ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!


चेन्नईने सामना गमावला, पण सर्वांना चीअरलीडरची पडली भुरळ; अभिनेत्रींना टक्कर देणारं सौंदर्य, पाहा Photo's