एक्स्प्लोर

संजू सॅमसननं जिंकला टॉस, हैदराबादच्या ताफ्यात 2 बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11 

SRH vs RR Qualifier 2 : सनरायइजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये काटें की टक्कर होणार आहे

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Qualifier 2 : राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज क्वालिफायर 2 सामना सुरु झालाय.. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर  दोन्ही संघ आमनेसामने आहेत. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. हैदराबादची फलंदाजी ताकद आहे, तर राजस्थानची गोलंदाजी ताकद आहे, त्यामुळे सामना रंजक होणार आहे. 

क्वालिफायर 2 मधील विजेता संघ फायनलमध्ये धडक मारणार आहे, तर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये हैदराबादचा पराभव झाला होता, तर एलिमेनटर सामन्यात राजस्थानने आरसीबीचा पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. हैदरबाद आणि राजस्थान यांच्यातील विजेता संघ 26 मे रोजी कोलकात्याशी चेन्नईसोबत भिडणार आहे.

संघात बदल काही झाले ?

राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात कोणताही बदल करण्यात आला नाही, मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आलाय. दुसरीकडे हैदराबादच्या ताफ्यात दोन बदल करण्यात आले आहेत. अनुभवी एडन मार्करम आणि जयदेव उनादकट यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देम्यात आलेय. 

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग 11  -

टॉम कोहलर-केडमोर, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि  युजवेंद्र चहल. 

इम्पॅक्ट प्लेयर : शिमरन हेटमायर, नद्रे बर्गर.

SRH Impact players Shahbaz Ahmed, Mayank Markande, Glenn Phillips, Sanvir Singh, Umran Malik

RR: 1 Yashasvi Jaiswal, 2 Tom Kohler-Cadmore, 3 Sanju Samson (capt & wk), 4 Riyan Parag, 5 Dhruv Jurel, 6 Rovman Powell, 7 R Ashwin, 8 Trent Boult, 9 Avesh Khan, 10 Sandeep Sharma, 11 Yuzvendra Chahal

RR Impact Players - Shimron Hetmyer, Nandre Burger, Shubham Dubey, Donovan Ferreira, Kuldeep Sen

सनरायजर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11 - 

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, जयदेव उनादकट

इम्पॅक्ट प्लेयर : वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, 

SRH1 Travis Head, 2 Abhishek Sharma, 3 Rahul Tripathi, 4 Aiden Markram, 5 Nitish Kumar Reddy, 6 Heinrich Klaasen (wk), 7 Abdul Samad, 8 Pat Cummins (capt), 9 Bhuvneshwar Kumar, 10 Jaydev Unadkat, 11 T Natarajan

SRH Impact players Shahbaz Ahmed, Mayank Markande, Glenn Phillips, Sanvir Singh, Umran Malik

राजस्थान- हैदराबाद हेड टू हेड आकडे  

सनरायइजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये काटें की टक्कर झाली आहे. आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ आतापर्यंत 19 वेळा भिडले आहेत. सर्व सामने रंगतदार झाले आहेत. सनरायजर्स हैदरादाबने 10 वेळा विजय मिळवलाय, तर राजस्थानला नऊ सामन्यात विजय मिळाला आहे. 

यंदाच्या हंगामात एकमेव लढत - 

यंदाच्या हंगामात राजस्थान आणि हैदराबाद यांच्यामध्ये फक्त एकवेळा सामना झालाय. ज्यामध्ये हैदराबादने विजय मिळवलाय. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 201 धावांचा पाऊस पाडला होता. धावांचा पाठलाग करताना राजस्थानने 200 धावांपर्यत मजल मारली होती. हैदराबादने फक्त एका धावेनं सामना जिंकला होता. आता हिशोब चुकता करण्यासाठी राजस्थानचा संघ मैदानात उतरलाय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Crime: शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Nitesh Rane : मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 26 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सRajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानातSpecial Report | Kunal Kamra Video | कुणाल कामराचा नवा व्हिडीओ, शिवसेनेला पुन्हा डिवचलंDmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli Crime: शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Nitesh Rane : मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत सरकारने कोणते 12 महत्त्वाचे निर्णय घेतले?
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Maharashtra Live: सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
Maharashtra Live: सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
Embed widget