चेन्नईचे दोन हुकमी एक्के संघाबाहेर, शार्दूल ठाकूरला संधी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IPL 2024 : चेन्नईविरोधात चेन्नईची धुरा पुन्हा एकदा सॅम करन याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. चेपॉक स्टेडियमवर सॅम करन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Chennai Super Kings vs Punjab Kings: पंजाब किंग्स संघाचा नियमित कर्णधार शिखर धवन आजच्या सामन्यालाही मुकला आहे. चेन्नईविरोधात चेन्नईची धुरा पुन्हा एकदा सॅम करन याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. चेपॉक स्टेडियमवर सॅम करन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. पण चेन्नईचे दोन हुकमी एक्के आज मैदानात दिसणार नाहीत.
मथीशा पथिराना आणि तुषार देशपांडे आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे नव्या दोन जणांना संधी देण्यात आली आहे. मथीशा पथिराना दुखापतग्रस्त असल्यामुळे आराम देण्यात आला आहे. त्याशिवाय तुषार देशपांडेही आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. तुषार देशपांडे यानं चेन्नईला सुरुवातीच्या षटकात विकेट मिळवून दिल्या आहेत. तर अखेरच्या षटकात मथीशा पथिराना यानं चेन्नईसाठी डाव पलटवला आहे. या दोन्ही खेळाडूंची कमी आज चेन्नईला नक्कीच जाणवेल, असं म्हटलं जातेय. चेन्नईने आजच्या सामन्यात शार्दूल ठाकूर आणि रिचर्ड ग्लीसन यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले आहे.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL win the toss and elect to bowl against @ChennaiIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2024
Follow the Match ▶️ https://t.co/EOUzgkM7XA#TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/1Y83T5v7Of
चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग 11 -
अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेरिल मिचेल, मोइन अली, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, रिचर्ड ग्लीसन, मुस्तफिजुर रहमान
पंजाब किंग्सच्या ताफ्यात कोण कोण ?
जॉनी बेयरस्टो, सॅम करन (कर्णधार), रीली रॉसो, शशांक सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह.
हेड टू हेड स्थिती काय ?
चेन्नई सुपर किंग्ज 10 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जनं पाच सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्जनं होम ग्राऊंडवर झालेल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सला पराभूत केलं होतं. आजच्या मॅचमध्ये चेन्नई विजय मिळवणार का हे पाहावं लागेल. आयपीएलच्या मागील चार सामन्यात पंजाबचं पारडं जड दिसलं होतं. दरम्यान, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज 28 वेळा आमने सामने आले आहेत. चेन्नईनं 15 वेळा विजय मिळवला आहे तर पंजाबनं 13 वेळा विजय मिळवला आहे.