एक्स्प्लोर

PBKS vs LSG, IPL 2023 Live: लखनौचा पंजाबवर विराट विजय

PBKS vs LSG Live Score: लखनौ सुपर जायंट्स संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आणि पंजाब संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजचा सामना जिंकून गुणतालिकेत उडी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

LIVE

Key Events
PBKS vs LSG, IPL 2023 Live: लखनौचा पंजाबवर विराट विजय

Background

IPL 2023, Match 38, PBKS vs LSG:  आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज 37 वा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील आजचा सामना 28 एप्रिलला पंजाबच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. लखनौ संघाला गामील सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे संघ आज पुन्हा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे पंजाब किंग्सने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे, त्यामुळे संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. 

PBKS vs LSG Match Preview : 'नवाब' विरुद्ध 'किंग्स'
लखनौ सुपर जायंट्स संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आणि पंजाब संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजचा सामना जिंकून गुणतालिकेत उडी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आयपीएल 2023 मध्ये दोन्ही संघांची परिस्थिती समान आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी सात सामने खेळले आहेत. लखनौने यंदाच्या हंगामात खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच पंजाब संघाने खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

Mohali Pitch Report : मोहालीची खेळपट्टी कशी आहे?
मोहालीतील (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमची (Punjab Cricket Association Stadium) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला.

LSG vs PBKS IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि पंजाब (PBKS) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. असून राजस्थान संघाने 12 सामन्यांत विजय मिळवला आहे. आजच्या धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई आणि संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान संघ आमने-सामने येणार आहेत.

PBKS vs LSG, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
पंजाब किंग्स (PBKS) आणि लखनौ सुपर किंग्स (LSG) यांच्यात 28 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना पंजाबमधील क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

23:33 PM (IST)  •  28 Apr 2023

पंजाबचा दारुण पराभव

पंजाबचा दारुण पराभव.. लखनौने पंजाबला 201 धावांत गुंडाळले

23:25 PM (IST)  •  28 Apr 2023

पंजाबला नववा धक्का

पंजाबला नववा धक्का, कगिसो रबाडा बाद झालाय

23:20 PM (IST)  •  28 Apr 2023

लखनौचे आठ फलंदाज तंबूत

लखनौचे आठ फलंदाज तंबूत... अथर्व तायडेचा अपवाद वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही

22:47 PM (IST)  •  28 Apr 2023

पंजाबला चौथा धक्का,  अथर्व तायडे बाद

सिंकदर रजा 26 धावांवर बाद झाला. तर अथर्व ताडये याने 66 धावांचे योगदान दिले. 

22:31 PM (IST)  •  28 Apr 2023

अथर्व तायडेचं दमदार अर्धशतक

अथर्व तायडे याने 26 चेंडूत दोन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Embed widget