एक्स्प्लोर

मिलर आणि आशुतोषनं पालटलं सामन्याचं चित्र, चुरशीच्या सामन्यात दिल्लीनं पंजाबला हरवलं 

अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला आहे. आशुतोष शर्मा आणि माधव तिवारी यांनी अखेरच्या षटकांमध्ये वादळी खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.

PBKS vs DC Full Highlights :  अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला आहे. आशुतोष शर्मा आणि माधव तिवारी यांनी अखेरच्या षटकांमध्ये वादळी खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला. या विजयाने दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा जिवंत झाल्या आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्सला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीने 19 षटकात 211 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. एकावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाची शक्यता केवळ 90 टक्के होती. मार्कस स्टोइनिसची विकेट पडल्यानंतर, दिल्ली अचानक पराभवाच्या दिशेने वाटचाल करू लागली होती. मात्र आशुतोष शर्मा आणि माधव तिवारीच्या खेळीनं दिल्लीला विजय मिळवता आला. 

मिलर आणि आशुतोष यांनी सामन्याचे चित्रच पालटले

अक्षर पटेल बाद झाल्यानंतर दिल्ली अचानक पराभवाच्या दिशेने वाटचाल करू लागली होती. अक्षर पटेलने 30 चेंडूंमध्ये 56 धावा करुन बाद झाला, तेव्हा 14 षटकांत दिल्लीची धावसंख्या 138/5 होती. विजयासाठी दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या पाच षटकांत 68 धावांची गरज होती. दिल्लीला शेवटच्या पाच षटकांत 68 धावांची गरज होती आणि डेव्हिड मिलर व आशुतोष शर्मा यांनी ही जबाबदारी स्वीकारली. डेव्हिड मिलरने सर्वात आधी वेग वाढवला. एके वेळी मिलर 20 चेंडूंमध्ये 28 धावांवर फलंदाजी करत होता आणि सात चेंडूंनंतर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. मिलर 51 धावांवर बाद झाला, पण दिल्लीच्या अडचणी सुटल्या नाहीत. दिल्लीला शेवटच्या तीन षटकांत 36 धावांची गरज होती.

पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 211 धावांचे लक्ष्य ठेवले होते

आयपीएल 2026 च्या 55 ​​व्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 211 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पंजाबने शानदार सुरुवात केली होती. अवघ्या 16 चेंडूंमध्ये 50  धावा करून इतिहास रचला होता. प्रियांश आर्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. मिचेल स्टार्कने दिल्लीसाठी पहिले षटक टाकले, ज्यात 22  धावा दिल्या. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने पहिल्याच षटकात इतक्या धावा करण्याची ही पहिलीच वेळ होती. पंजाबचा डाव 210 धावांवर थांबला. कर्णधार श्रेयस अय्यर 59 धावांवर नाबाद राहिला. मिचेल स्टार्कने दोन बळी घेतले, पण आपल्या चार षटकांत 57 धावा दिल्या.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सला प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या यांनी पुन्हा एकदा दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी 6.5 षटकांत पहिल्या विकेटसाठी 78 धावा जोडल्या. प्रभसिमरन 15 चेंडूंमध्ये 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर प्रियांश आर्याने 33 चेंडूंमध्ये 56 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि सहा षटकार मारले.

पंजाब किंग्सने 97 धावांवर आपले दोन्ही सलामीचे फलंदाज गमावले. त्यानंतर, कूपर कॉनॉलीने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 चेंडूंमध्ये 83 धावा जोडून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. कूपर कॉनॉलीने 27 चेंडूंमध्ये दोन षटकार आणि तीन चौकारांसह 38 धावा केल्या. पंजाब किंग्सने 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टोइनिस (1) गमावला. पुढच्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने शशांक सिंगला (0) बाद केले. सूर्यांश शेडगे आणि श्रेयस अय्यर यांनी सहाव्या विकेटसाठी 10 चेंडूंमध्ये नाबाद 23 धावांची भागीदारी करून संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. अय्यर 36 चेंडूंमध्ये तीन षटकार आणि पाच चौकारांसह 59 धावांवर नाबाद राहिला, तर सूर्यांशने आठ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि तेवढ्याच चौकारांसह 21 धावा जोडल्या. दिल्लीकडून मिचेल स्टार्क आणि माधव तिवारी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर मुकेश कुमारने एक बळी घेतला.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case: : निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case: : निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Embed widget