एक्स्प्लोर

GT vs MI : डॅनिअल सॅम्सने सामना फिरवला, रोमांचक सामन्यात मुंबईचा गुजरातवर पाच धावांनी विजय, साहा-गिलची खेळी व्यर्थ

GT vs MI, IPL 2022 : रोमांचक सामन्यात मुंबईने गुजरातवर पाच धावांनी विजय मिळवलाय. अखेरच्या षटकात डॅनिअल सॅम्सने भेदक मारा करत सामना फिरवला.

GT vs MI, IPL 2022 : रोमांचक सामन्यात मुंबईने गुजरातवर पाच धावांनी विजय मिळवलाय. अखेरच्या षटकात डॅनिअल सॅम्सने भेदक मारा करत सामना फिरवला. मुंबईने दिलेल्या 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 172 धावांपर्यंत मजल मारु शकला.  शुभमन गिल-वृद्धीमान साहा यांची वादळी अर्धशतकं गुजरातला विजय मिळवून देऊ शकली नाहीत. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील हा दुसरा विजय होय. 

मुंबईने दिलेल्या 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाने दमदार सुरुवात केली. सलामी फलंदाज शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी वादळी खेळी केली. दोघांनीही अर्धशतकी खेळी करत सामना एकहाती गुजरातच्या बाजूने वळवला. दोंघानी 12 षटकांत 106 धावांची सलामी दिली. शुभमन गिलने 36 चेंडूत 52 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान गिलने दोन षटकार आणि सहा चौकार लगावले. तर वृद्धीमान साहाने 40 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान साहाने दोन षटकार आणि सहा चौकार लगावले. साहा-गिल यांनी गुजरातला दणक्यात सुरुवात करुन दिली. मात्र एम अश्विनने एकाच षटकात दोघांनाही बाद करत सामन्यात रंगत निर्माण केली. हार्दिक पांड्या 24 आणि साई सुदर्शन 14 धावा काढून बाद झाले. त्यानंतर डेविड मिलर आणि राहुल तेवातिया यांना गुजरातला विजय मिळवून देण्यात अपयश आले. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात धावांचा पाठलाग करताना गुजरातचा पहिल्यांदाच पराभव झाला. मुंबईकडून एम अश्विनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर पोलार्डला एक विकेट मिळाली. डॅनिअल सॅम्सने अखेरच्या षटकात फक्त तीन धावा देत सामना फिरवला. 

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची वादळी सुरुवात त्यानंतर टीम डेविडच्या फिनिशिंग टचच्या जोरावर मुंबईने निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या. रोहित शर्मा 43,ईशान किशन 45 आणि टीम डेविड 44 धावांची खेळी केली.  

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या आयपीएलमध्ये फ्लॉग गेलेल्या रोहित शर्माने गुजरातविरोधात तुफान फटकेबाजी केली. रोहित शर्माने सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी सहा षटकार 61 धावा चोपल्या. रोहित शर्माने 29 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहित शर्माने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 74 धावांची सलामी दिली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करण्यात अपयश आले. सूर्यकुमार यादव अवघ्या 13 धावा काढून माघारी परतला. सूर्यकुमार यादवनंतर ईशान किशनही बाद झाला. ईशान किशन याने 29 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ईशान किशन याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. अष्टपैलू कायरन पोलार्डला आज पुन्हा एकदा अपयश आले. पोलार्डला 014 चेंडूत फक्त चार धावा काढता आल्या. तिलक वर्मा 21 धावांवर धावबाद झाला. अखेरच्या दोन षटकार टीम डेविडने विस्फोटक फलंदाजी करत मुंबईची धावसंख्या वाढवली.  टीम डेविडने 21 चेंडूत 44 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान डेविडने चार षटकार आणि दोन चौकार लगावले.  

गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.  त्याशिवाय अल्झारी जोसेफ, लॉकी फर्गुसन, प्रदीप सांगवान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget